मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिझनची सुरूवात 7 एप्रिलपासून होत आहे. पहिलाच सामना हा गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ससोबत पहिला सामना रंगणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. तर फायनल मॅच ही वानखेडे स्टेडिअममध्ये 27 एप्रिल रोजी होणार आहे. या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चैन्नई सुपर किंग्स हे दोन संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर आता पुन्हा मैदानावर उतरणार आहेत.
विदेशी खेळाडू आता आय़पीएलसाठी भारतात येत आहेत. आयपीएलचे सिक्सर किंग क्रिसे गेल देखील भारतात येत आहे. भारतात येणारा आणि आयपीएल खेळणारा क्रिस गेल खास आहे. क्रिस गेल गेल्यावर्षी पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा हिस्सा होता. आता तो किंग्स इलेव्हन पंजाबचा हिस्सा असणार आहे.
आयपीएलसाठी क्रिस गेल भरपूर एक्साईड आहे. भारतात येण्यासाठी तो किती उत्सुक आहे याची माहिती क्रिस गेलने सोशल मीडियावर दिली आहे. गेलने ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिस गेल पंजाबी गाण्यावर भांगडा करताना दिसत आहे. किंग्स इलेव्हन पंजाबशी संबंध आल्यानंतर आता गेल पूर्णपणे पंजाबी रंगात रंगला आहे. त्याच्या या भांगडा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.