IND vs PAK : पुन्हा मौका मौका! टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने

टीम इंडिया (Team India) आपला कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध लवकरच भिडणार आहे.

Updated: Jun 1, 2022, 04:16 PM IST
IND vs PAK : पुन्हा मौका मौका! टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने title=

मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे. टीम इंडिया (Team India) आपला कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध लवकरच भिडणार आहे. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सामना 31 जुलैला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान आपला संघ जाहीर केला आहे. हा हायव्होल्टेज सामन्याचं आयोजन हे कॉमनवेल्थ गेम्समध्ये करण्यात आलं आहे. (commonwealth games 2022 womens cricket ind vs pak high voltage match pakistan announced squad against team india)

जुलैमध्ये यूनायटेड किंगडममधील (United Kingdom) बर्मिंघममध्ये कॉमनवेल्थ गेम्सचं (Commonwealth Games 2022) आयोजन करण्यात आलंय.  या स्पर्धेनिमित्त पुन्हा एकदा भारत-पाक महिला संघामध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. 

या हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तान महिला क्रिकेट टीम 16-24 जुलैपर्यंत बेलफास्टमध्ये टी20 वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि यजमान आयर्लंड विरुद्ध दोन हात करणार आहे. 

या 2 मालिकांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये 3 राखीव खेळाडूंचा समावेश आहे.  

यानंतर पाकिस्तान टीमचा 29 जुलै-3 ऑगस्ट दरम्यान कॉमनवेल्थ गेम्समध्ये बारबाडोस, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.  

टीम इंडियाच्या या स्पर्धेतील मोहिमेचा श्रीगणेशा हा  29 जुलैपासून होणार आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना हा 29 जुलैला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. यानंतर 2 दिवसाच्या अंतराने पाकिस्तान विरुद्ध 31 जुलैला सामना पार पडेल. तर 3 ऑगस्ला बारबाडोस विरुद्ध मॅच होणार आहे.

पाकिस्तान महिला क्रिकेट टीम : बिस्माह मारूफ (कॅप्टन), एमेन अनवर, आलिया रियाज, अनम अमीन, आयशा नसीम, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा (विकेटकीपर), इरम जावेद, कायनात इम्तियाज, मुनीबा अली सिद्दीकी (विकेटकीपर), निदा डार, ओमैमा सोहेल, सादिया इकबाल आणि तुबा हसन.