Corona : हार्दिक पांड्या नताशासोबत 'लॉकडाऊन'

भारतामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.

Updated: Mar 26, 2020, 09:58 PM IST
Corona : हार्दिक पांड्या नताशासोबत 'लॉकडाऊन'

मुंबई : भारतामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. मोदींच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनाही घरात बसण्याची वेळ आली आहे. भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची होणारी बायको नताशा स्टानकोविच हेदेखील एकमेकांसोबत घरात वेळ घालवत आहेत.

नताशाने हार्दिकसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये हार्दिक आणि नताशा बेडवर झोपलेले दिसत आहेत. या दोघांच्यामध्ये एक कुत्रादेखील आहे. घरातच राहा आणि सुरक्षित राहा, असं कॅप्शन नताशाने या फोटोला दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#stayhomestaysafe #quarantine @hardikpandya93

A post shared by Nataa Stankovi (@natasastankovic__) on

हार्दिक पांड्या हा दुखापतीमुळे बराच कालावधी मैदानाच्या बाहेर आहे. आयपीएलमधून हार्दिक पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. पण कोरोनामुळे २९ मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर आयपीएल स्पर्धा रद्द होऊ शकते. आयपीएलआधी डी.वाय.पाटील टी-२० स्पर्धेत हार्दिक पांड्याने वादळी खेळी केल्या होत्या. 

नताशा हार्दिकचा बोल्ड फोटो

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी १ जानेवारी २०२० साली साखरपुडा केल्याची घोषणा केली. नताशा स्टानकोविच ही सर्बियन मॉडेल आहे. बॉलीवूडमध्ये नताशाने आयटम साँगही केली आहेत. 

हार्दिक पांड्याच्या होणाऱ्या बायकोचे हॉट फोटो