नताशाचा हार्दिक पांड्यासोबतचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टानकोविचचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Jan 14, 2020, 12:48 PM IST
नताशाचा हार्दिक पांड्यासोबतचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टानकोविचचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये हार्दिक आणि नताशा समुद्र किनाऱ्यावर सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिक आणि नताशाने साखरपुडा केला. हार्दिकने इन्स्टाग्रामवर नताशासोबतचा फोटो शेयर करुन साखरपुड्याची घोषणा केली. बादशाहचं 'डीजे वाले बाबू' या गाण्यातून नताशा लोकप्रिय झाली.

नताशा आणि हार्दिकचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नताशाने काळ्या रंगाचा स्वीम सूट घातला आहे. खुद्द नताशानेच हा फोटो शेयर केला आहे. नताशाच्या या फोटोवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#throwback @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

नताशा स्टानकोविच ही सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या चित्रपटातून नताशाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बिग बॉस सिजन ८ आणि डीजे वाले बाबू या गाण्यामुळे नताशा प्रकाशझोतात आली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

२०१२ साली नताशा अभिनय क्षेत्रात कारकिर्द करण्यासाठी भारतात आली. मॉडेल म्हणून नताशाने फिलिप्स, कॅडबरी, जॉनसन ऍण्ड जॉनसन या ब्रॅण्ड्ससोबत सुरुवात केली. २०१३ साली सत्याग्रह चित्रपटात नताशा दिसली. अमिताभ बच्चन, अजय देवगन आणि करीना कपूर यांनी सत्याग्रह या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात नताशाने 'अईयो जी' हे आयटम साँग केलं होतं. 'फुकरे रिटर्न्स'मध्ये नताशा 'मेहबुबा' या आयटम सॉन्गमध्ये दिसली. शाहरुखच्या झिरो या चित्रपटातही नताशाने छोटासा रोल केला होता. 

हार्दिक पांड्याच्या होणाऱ्या बायकोचे हॉट फोटो