Babar Azam Captaincy Resign: आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये पाकिस्तान संघाची (Pakistan Cricket Team) कामगिरी अत्यंत सुमार झाली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) कर्णधारपदाचा राजीनामा (Resigne) दिला आहे. क्रिकेटच्यी तीनही प्रकारात बाबरने कर्णधारपदावरून बाजूला झाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ आयसीसी विश्वचषकात खेळायला उतराला होता. पण पाकिस्तनला नऊ पैकी केवळ पाच सामन्यात विजय मिळवता आला. त्यामुळे पाकिस्तान संघाला लीगमध्येच गाशा गुंडाळावा लागला. त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व परदेशी कोच स्टाफची हकालपट्टी केली होती.
पाकिस्तान संघाने सुरुवातीचे दोन सामने जिंकत दमदार सुरुवात केली. पण तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि पाकिस्तानच्या कामगिरीला ग्रहण लागलं. पाकिस्तानला नऊपैकी पाच सामन्यात पराभव पत्करावा लागाल. या स्पर्धेत स्वत: कर्णधार बाबर आझमची कामगिरीही खास झाली नाही. त्यामुळे अनेक दिग्गज आणि क्रिकेट समीक्षकांनी बाबर आझमवर टीका केली होती.
बाबर आझमने केली पोस्ट
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या तीन प्रकारातून राजीनामा देत असल्याचं स्वत: बाबर आझमने पोस्ट करत घोषणा केली. यावेळी त्याने पहिल्यांदा कर्णधारपद मिळाल्याची आठवण सांगितली आहे. कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी बाबर आझन पाकिस्तान संघासाठी क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळत राहाणार आहे.
पोस्टमध्ये बाबरने काय लिहिलं?
आपल्या राजीनाम्याची बातमी बाबरने X वर पोस्ट केली आहे यात त्याने म्हटलंय 'मला तो क्षण चांगला आठवतो जेव्हा 2019 मध्ये पाकिस्तान संघाचं नेतृत्व करण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा फोन आला होता. गेल्या चार वर्षात मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक चढउतार पाहिले. पण मी पूर्णपणे झोकून आणि मनापासून क्रिकेट जगतात पाकिस्तानचा गौरव कायम राहाण्याचं लक्ष्य ठेवलं. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाला अव्वल क्रमांकावर नेलं. यात खेळाड, प्रशिक्षक आणि व्यवस्थापिक सदस्यांचा मोठा वाटा होता. या संपूर्ण प्रवासात पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांनी खूप प्रेम दिलं. मी त्यांचा मनापासून आभारी आहे'
'मी आज तीन प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हा एक कठिण निर्णय आहे. पण मला वाटतं हा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. तीनही प्रकारात खेळाडू म्हणून पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करत राहीन. नवा कर्णघाप आणि संघाला माझा संपूर्ण पाठिंबा असेल. मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचाही आभारी आहे, ज्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी दिली. असं बाबर आझमने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
— Babar Azam (@babarazam258) November 15, 2023
कर्णधार म्हणून अपयशी
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ विश्वचषकात पूर्णपणे अपयशी ठरला. बाबर आझमने नऊ सामन्यात केवळ 320 धावा केल्या. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ एकही मोठी स्पर्धा जिंकू शकलेला नाही. बाबरच्या नेतृत्वाखाली 2022 टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, टी20 विश्वचषकाची सेमीफायनल आणि एशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला होता. एशिया कप 2023 मध्येही सुपर-4 मध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता.