IND vs SL : भारताविरुद्ध सनथ जयसूर्या खेळणार तिरकी चाल, पहिल्या सामन्याआधी गौतम गंभीरला टेन्शन!

India vs Sri Lanka 1st T20 : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यातील टी-ट्वेंटी मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय खेळणार आहे. त्यावर आता अंतरिम कोच सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याने मोठं वक्तव्य केलंय. 

सौरभ तळेकर | Updated: Jul 25, 2024, 06:43 PM IST
IND vs SL : भारताविरुद्ध सनथ जयसूर्या खेळणार तिरकी चाल, पहिल्या सामन्याआधी गौतम गंभीरला टेन्शन! title=
ind vs srilanka first t20 coach Sanath Jayasuriya

IND Vs SL Sanath Jayasuriya On Rohit Virat : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-ट्वेंटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने संघ जाहीर केला होता. अशातच आता पहिल्यांदाच भारतीय प्रमुख टी-ट्वेंटी संघ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुस्थितीत खेळणार आहे. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असेल. अशातच आता भारताची पडती बाजू लक्षात येताच भारताविरुद्ध अंतरिम कोच सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) तिरकी चाल खेळणार असल्याचं त्याने स्वत:च जाहीर केलंय. 

काय म्हणाला Sanath Jayasuriya?

रोहित शर्मा आणि विराट कोहली जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. ज्याप्रकारे त्यांनी क्रिकेटमध्ये योगदान दिलंय, त्याला कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे विराट रोहित आणि जडेजा कोणत्या स्थानावर आहे, याचा अंदाज सर्वांना येतो. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आता टीम इंडियाला नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्हाला या संधीचा फायदा उठवायला हवा, असं सनथ जयसूर्याने म्हटलं आहे.

राजस्थान रॉयल्सचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर जुबिन भरुचा यांनी श्रीलंकेला मोलाची मदत केली. श्रीलंकेचे काही खेळाडू लंका प्रीमियर (LPL) लीगशी संबंधित असूनही, भरुचासोबत सहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आम्ही लगेच श्रीलंका प्रिमियर लीग सुरू केला आणि खेळाडूंना क्रिकेटमध्ये व्यस्थ ठेवलं. खेळाडूंनी अधिकाधिक क्रिकेट खेळलं पाहिजे, असं जुबिन भरुचा यांनी क्रिकेट बोर्डाला सांगितलं होतं. मला आशा आहे की खेळाडूंनी व्यवस्थापन सराव आणि तंत्राच्या बाबतीत तुम्हाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते शिकले असेल, असं सनथ जयसूर्या म्हणाला आहे. 

टी-ट्वेंटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ - चरिथ असलंका (C), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा, बिनुरा फर्नांडो. 

टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.