Women Cricket : महिला क्रिकेटर्ससाठी आजा दिवस ऐतिहासिक ठऱला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) महिला क्रिकेटर्ससाठी (Women Cricketers) एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटर्सना पुरुष क्रिकेटर्स इतकंच मानधन (Prize Money) दिलं जाणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी ट्विट करत आयसीसीच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
दक्षिण आफ्रिकेतल्या डरबन इथं झालेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. आगामी आसीसी टी20 विश्वचषकापासून महिला क्रिकेटपट स्पर्धेच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता आहे. महिलां क्रिकेटर्सना पुरुष क्रिकेटर्स इतकंच मानधन देण्यात यावं याविषयी गेल्या अनेक काळापासूनची मागणी होती. अनेकवेळा यावर बैठक झाली पण ठोस निर्णय घेतला जात नव्हता. अखेर आज या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेम बार्कले यांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढे आयसीसी स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटर्सना समान मानधन देण्यात येईल. हा निर्णय घेताना मला खूप आनंद होत आहे, क्रिकेट खेळातील हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
I am thrilled to announce that a major step towards gender parity & inclusivity has been undertaken. The prize money at all @ICC events will be same for men & women. Together we grow.…
— Jay Shah (@JayShah) July 13, 2023
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी 2017 पासून प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक वर्षी महिलांच्या क्रिकेट स्पर्धेतील मानधनात वाढ केली जात आहे. आता आयसीसी महिला विश्वचषक आणि पुरुष विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंना समान मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टी20 वर्ल्ड कप आणि अंडर19 विश्वचषकासाठी सुद्धा हा निर्णय लागू होणार आहे. 2030 पर्यंत महिला आणि पुरुषांना समान बक्षीसांची रक्कम देण्यात येणार आहे. वनडे, टी 20 आणि इतर आयसीसीच्या स्पर्धामध्ये दोन्ही संघांना समान रक्कम असणार आहे.
या निर्णयाआधी महिला आणि पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या मानधनात मोठी तफावत होती. पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये इंग्लंड संघाने जेतेपद पटकावलं होतं. त्यावेळी त्यांना 28.4 कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या न्यूझीलंड संघाला 14.2 कोटी रुपये देण्यात आलेह होते. याऊलट महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 2022 ला ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ चॅम्पियन ठरली होती. त्यावेळी त्या संघाला 9.98 कोटी रुपये देण्यात आले होते. तर उपविजेत्या इंग्लंड संघाला 4.53 कोटी रुपये मिळाले.