IND VS BAN t20 3rd Match : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात शनिवारी टी 20 सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर मोठा विजय मिळवला असून टेस्ट सीरिजनंतर टी 20 सीरिजमध्येही त्यांना क्लीन स्वीप दिलंय. टीम इंडियाने हैदराबाद येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 133 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचे फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करताना फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंकडूनही अनेक चुका झाल्या. एका प्रसंगी हार्दिक आणि रियान क्रीजच्या एकाच बाजूला उभे असताना देखील बांगलादेशचे फिल्डर त्यांना रन आउट करू शकले नाहीत.
भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. यावेळी 18 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर हार्दिक पंड्या स्ट्राईकवर होता. तो पर्यंत टीम इंडियाचा स्कोअर 250 पार पोहोचला. गोलंदाज मुस्तफिजूरने टाकलेला ओव्हरमधील तिसरा बॉल हार्दिकने मिस केला आणि बॉल त्याच्या जवळच जाऊन पडला. हार्दिकला रन घेण्यासाठी धावायचे नव्हते, परंतु रियान पराग हा तो पर्यंत हार्दिक जवळ पोहोचला होता. दोन्ही फलंदाज एकाच क्रीजवर असलेले पाहून विकेटकीपर लिटन दासने बॉल उचलला आणि नॉन स्ट्राइकर एंडवर थ्रो केला. पण लिटन दासचा थ्रो गोलंदाजाच्या हातात जाण्याऐवजी त्याच्या डोक्यावरून गेला.
गोलंदाज मुस्तफिजुर रहमान फक्त उभं राहून पाहत होता. यानंतरही लॉन्ग ऑफचा फील्डर नजमुल हुसैन शंतोकडे बॉल कॅच करून विकेटवर मारण्याचा चान्स होता मात्र तो बॉल कलेक्ट करू शकला नाही. तो पर्यंत हार्दिक पंड्या धावत नॉन स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचला. रनआउट करण्याऐवजी बांगलादेशचे फिल्डर फक्त एकमेकांकडे बॉल पास करत होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांना रनआउट करण्यात बांगलादेशचे फिल्डर अपयशी ठरले.
हेही वाचा : बाबा सिद्दीकीच्या हत्येमुळे भारताच्या माजी क्रिकेटरला बसला धक्का, रात्री 2 वाजता केलं 'हे' काम
— alex (@AlexHivklzzyh) October 12, 2024
कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी ओपनिंग बॅट्समन संजू सॅमसनने जोरदार शतक ठोकले, त्याने 47 बॉलमध्ये 111 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने सुद्धा 35 बॉलमध्ये 75 धावा केल्या. तर रियान परागने 34 आणि हार्दिक पंड्याने 47 धावा केल्या. यासह टीम इंडियाने 6 विकेट्स गमावून 297 धावा केल्या. हा आयसीसीचे सदस्य आणि टेस्ट खेळणाऱ्या कोणत्याही देशाच्या क्रिकेट टीमने टी 20 मध्ये केलेला सर्वात मोठा स्कोअर होता. तर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांग्लादेशच्या 7 विकेट्स घेऊन त्यांना 164 धावांवर रोखले आणि 133 धावांनी विजय मिळवला.