क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप, टीममधून काढलं बाहेर

आज क्रिकेटरला खूपच महत्त्वाचं स्थान दिलं जातं. त्याचे खूप सारे फॅन्स असतात. जे त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण अशाच एका क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप झाला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 1, 2017, 01:06 PM IST
क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप, टीममधून काढलं बाहेर title=

नवी दिल्ली : आज क्रिकेटरला खूपच महत्त्वाचं स्थान दिलं जातं. त्याचे खूप सारे फॅन्स असतात. जे त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण अशाच एका क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप झाला आहे. 

टीमच्या डायरेक्टरवरही आरोप

ऑस्ट्रलियामध्ये जन्मलेला प्रसिद्ध काउंटी क्रिकेट क्लबचा खेळाडू अॅलेक्स हेपबर्नवर बलात्काराचा आरोप झाला आहे. 21 वर्षीय हेपबर्नसोबतच वोस्टरशायर टीमचा डॉयरेक्टर स्टीव रोड्सवर देखील आरोप झाला आहे.

२ वेळा झाले बलात्काराचे आरोप

याआधी देखील हेपबर्नवर बलात्काराचे आरोप झाले आहेत. क्लबने म्हटलं की, हेपबर्नला पहिल्यांना बलात्काराच्या गुन्हात एक एप्रिलला अटक झाली होती. त्यानंतर त्याने स्टीव रोड्सला संपर्क केला. ही गोष्ट लपवण्यासाठी दोघांमध्ये सहमती झाली. यावर चौकशी अजून सुरु आहे. सध्या या दोघांना संघातून बाहेर करण्यात आलं आहे.

दोघांना संघातून केलं बाहेर

हेपबर्नवर दोनदा बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. एक एप्रिल 2017 ला बलात्काराच्या २ घटना समोर आल्या होत्या. ग्लूस्टरशायर क्रिकेट क्लबच्या कोचने म्हटलं की, "इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड याबाबत पुष्टी करतो की, स्टीव रोड्स प्रमुख कोच म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ नयेत. रोड्सच्या जागी रिचर्ड डॅवस्न यांना पाठवण्यात येणार आहे.