Shikhar Dhawan च्या पत्नीचं पहिलं प्रेम, पहिलं लग्न आणि दोन मुली !

क्रिकेटपटू शिखर धवनची आणि आयशा मुखर्जी  यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

Updated: Sep 8, 2021, 07:36 AM IST
 Shikhar Dhawan च्या पत्नीचं पहिलं प्रेम, पहिलं लग्न आणि दोन मुली ! title=

मुंबई : क्रिकेटपटू शिखर धवनची आणि आयशा मुखर्जी  यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता.. 9 वर्षांनंतर या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आयशाने घटस्फोट हा शब्द खूप वाईट असल्याचं ही म्हटलं आहे.पोस्ट शेअर करत तिनं असं म्हटलं आहे.

क्रिकेटपटू शिखर धवन आधी आयशा मुखर्जीने एका ऑस्ट्रेलियन बिझनेसमन सोबत पहिलं लग्न केलं होतं. बंगाली असल्याने सुरुवातीला तिला तिच्या ऑस्ट्रेलियन जोडीदारासोबत स्थायिक होण्यासाठी थोड्या अडचणींना सामोरे जावे लागले होते.

शिखर धवनच्या पत्नीने तिच्या पहिल्या जोडीदारासह तिच्या पहिल्या मुलीला म्हणजेच आलियाला जन्म दिला. त्याने अगदी पाच वर्षांत दोघांना दुसरी मुलगी झाली. 2005 मध्ये आयशा मुखर्जीने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. जिचं नाव रिया असं ठेवण्यात आलं.

पहिल्या लग्नात आयेशा मुखर्जीसाठी सर्व काही परिपूर्ण होते. पण नंतर तिला तिच्या पहिल्या पतीबरोबर समस्या येऊ लागल्या आणि 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि घटस्फोटानंतर तिच्या दोन्ही मुली शिखर धवनची पत्नी आयेशासोबत राहत होत्या आणि कधीकधी त्या वडिलांना ही भेटायला जात होत्या.