टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार खेळाडू विवाहबंधनात, कोण आहे ती भाग्यवान?

टीम इंडियाला (Team India) आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधार विवाहबद्ध झाला आहे.   

Updated: Nov 21, 2021, 08:46 PM IST
टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार खेळाडू विवाहबंधनात, कोण आहे ती भाग्यवान?  title=

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (Team India vs New Zealand 3rd T 20) यांच्यात तिसरा टी 20 सामना खेळला जात आहे. एका बाजूला हा सामना सुरु असताना दुसऱ्या बाजूला मात्र टीम इंडियाला (Team India) आपल्या नेतृत्वात 19 वर्षांखालील वर्ल्ड कप  (ICC U19 World Cup)  जिंकून देणारा उनमुक्त चंद विवाहबद्ध झाला आहे. उनमुक्त चंदच्या  (Unmukt Chand)  विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उन्मुक्तच्या लग्नात त्याचे नातेवाईक आणि अनेक मित्र उपस्थित होते. (Cricketer unmukta chanda has married with Fitness and Sports Nutrition Coach simran khosla)

कोण आहे उनमुक्तची पत्नी?

सिमरन खोसला  (Simran Khosla) असं उन्मुक्तच्या पत्नीचं नाव आहे. सिमरन ही (Fitness & Sports Nutrition Coach) फिटनेस एंड न्यूट्रीशन कोच आहे.

क्रिकेटमधून निवृत्ती

दरम्यान उन्मुक्तने याच वर्षी ऑगस्टमध्ये क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केली होती. त्यानंतर तो अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी गेला. उन्मुक्तच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात तर झोकात झाली. मात्र त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. दरम्यान आता हा वर्ल्ड कप विजेता कर्णधार ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना दिसणार आहे.

ऑस्ट्रेलियात या स्पर्धेत खेळणार 

उन्मुक्त आता ऑस्ट्रेलियातील आयपीएल म्हणजेच बीग बॅश लीगमध्ये (BBL) खेळणार आहे. उन्मुक्त या स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स टीमकडून खेळणार आहे. विशेष म्हणजे उन्मुक्त या स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय आहे.

नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड कप 

उन्मुक्तने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 2012 चा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. उनमुक्तने अंतिम सामन्यात धमाकेदार खेळी केली होती. तेव्हा उन्मुक्तला भविष्यातील विराट कोहली असं म्हंटलं गेलं. मात्र संधी न मिळाल्याने तसेच चांगली कामगिरी न केल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 

दरम्यान उन्मुक्तने आयपीएलमध्ये दिल्ली, मुंबई आणि राजस्थानचं प्रतिनिधित्व केलं. मात्र यातही त्याला आपली छाप सोडता आली नाही.