ती क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न करण्यास उत्सुक होती, कोहलीनेच सांगितला किस्सा

विराट कोहलीने हो म्हटलं असतं, तर ती क्रिकेटर आता विराट कोहलीची बायको राहिली असती, विराट कोहलीनेच सांगितलाय हा किस्सा

Updated: May 15, 2021, 02:04 PM IST
ती क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न करण्यास उत्सुक होती, कोहलीनेच सांगितला किस्सा

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी खूप जास्त लोकप्रिय आहे. विराटचं नाव जगातील सर्वात उत्तम फलंदाजांमध्ये घेतलं जातं तर अनुष्का शर्माला तिच्या अभिनयामुळे उत्तम दर्जा बॉलिवूडमध्ये मिळाला आहे. क्रिकेटमुळे विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. विदेशी टीमची महिला कर्णधार चक्क कोहलीच्या प्रेमात वेडी होती. याचा किस्सा देखील कोहलीने सांगितला आहे. 

कपिल शर्मा कार्यक्रमात एकदा कपिलने यासंदर्भात खुलासा केला. बांग्लादेश विरुद्ध टी 20 वर्ल़्ड कपचा सेमिफायनल सामना खेळून झाल्यानंतर इंग्लंडमधील महिला क्रिकेट टीमच्या माजी कर्णधारने विराट कोहलीला प्रपोज केलं होतं. विराट कोहली सामन्यांमध्ये इतका व्यस्त होता की त्याचं याकडे लक्ष गेलं नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Danielle Wyatt (@danniwyatt28)

इंग्लंड महिला संघाची माजी कर्णधार डेनिएल वॅटने ट्वीटरवर प्रपोज केलं होतं. तिने कोहलीसाठी खूपदा ट्वीटही केले होते. त्याचं कौतुक देखील केलं होतं. मात्र कोहलीचं त्याकडे विशेष लक्षही नव्हतं. तो सामने खेळण्यात व्यस्त होता. तर त्याच्या आईनं एका मुलाखतीत त्याचं आता लग्नाचं वय नाही असंही स्पष्ट केलं होतं. 

कोण आहे डॅनियल वॅट?

29 वर्षीय डेनिएलने इंग्लंडसाठी 74 वन डे, 113 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वन डे सामन्यात तिने 1,028 धावा केल्या आहेत आणि 27 विकेट्स तिच्या नावावर आहेत. टी 20 सामन्यात 1,630 धावा केल्या आहेत तर 46 विकेट्स तिच्या नावे आहेत.