क्रिकेटमधून निवृत्तीनंतर धोनी काय करणार? पाकिस्तानी खेळाडू म्हणाला...

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी काय करणार? पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरकडून खुलासा

Updated: Jul 24, 2021, 07:22 PM IST
क्रिकेटमधून निवृत्तीनंतर धोनी काय करणार? पाकिस्तानी खेळाडू म्हणाला...

मुंबई: महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्यानंतर आता IPL मधूनही संन्यास घेणार का अशा चर्चा सुरू असतानाच भविष्यात धोनी काय करणार अशीही एक चर्चा रंगताना दिसत आहे. बरेच क्रिकेटपटू हे कॉमेंटेटर म्हणून पुढे काम करतात पण धोनी पुढे काय करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. आयपीएलमध्ये धोनीचा संघ कमालीची कामगिरी करत आहे. आयपीएलमधून संन्यास घेतल्यावर धोनी काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

महेंद्रसिंह यांच्याबद्दल पाकिस्तानचे माजी क्रिकेटर दानिश कनेरिया यांनी आपली भविष्यवाणी सांगितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार धोनी भविष्यात कॉमेन्ट्रीसाठी उतरणार नाही. तर कोचिंग करण्यासाठी मैदानात उतरेल. कनेरिया यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर हा खुलासा केला आहे. त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. 

कनेरिया यांच्या म्हणण्यानुसार धोनी आयपीएलमधून संन्यास घेतल्यानंतर कोचिंग करेल. लवकरच धोनी आपल्या या नव्या इनिंगला सुरुवात करेल असं मला वाटतं. कोच म्हणून तो आपल्या नव्या करियरची सुरुवात करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जुलै 2019 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी वर्ल्ड टी 20 क्रिकेट विश्वचषकआणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले. याशिवाय 2009 मध्ये प्रथमच कसोटी सामन्यात भारत अव्वल क्रमांकावर झाला.