Jasprit Bumrah: इंग्लिश क्रिकेटर जसप्रीत बुमराहची चाहती, सोशल मीडियावर शेअर केली ही खास पोस्ट

Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आता क्रिकेटच्या मक्का लॉर्ड्सवर विजय मिळवण्याकडे लक्ष देत आहे.  

Updated: Jul 14, 2022, 09:48 AM IST
Jasprit Bumrah: इंग्लिश क्रिकेटर जसप्रीत बुमराहची चाहती, सोशल मीडियावर शेअर केली ही खास पोस्ट title=

मुंबई : Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आता क्रिकेटच्या मक्का लॉर्ड्सवर विजय मिळवण्याकडे लक्ष देत आहे. या सामन्यात सर्व चाहत्यांच्या नजरा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर असतील. पहिल्या सामन्यात तो खूपच इंग्लंडला महागात पडला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने एकट्याने संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीवर अनुभवी इंग्लिश क्रिकेटर देखील त्याची चाहती झाली आहे.

ही क्रिकेटर बुमराहची चाहती

जसप्रीत बुमराह याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. बुमराहच्या या कामगिरीचे सर्वजण कौतुक करत आहेत. या सगळ्यामध्ये इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वॅट (Danielle Wyatt) हिचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. वास्तविक, डॅनियल वॅटही बुमराहच्या या शानदार कामगिरीची चाहची झाली आहे. जसप्रीत बुमराहला ट्विटरवर टॅग करत त्याने लिहिले, 'Unplayable'.

विराट कोहलीला केले होते प्रपोज  

डॅनियल वॅट हिने एकदा टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यासमोर चक्क लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तिने विराटला प्रपोज केले होते. तसे तिने ट्विटही केले होते. त्यानंतर डॅनियल वॅट ही पहिल्यांदाच चर्चेत आली होती. डॅनियल वॅटने 2014 मध्ये विराट कोहलीला ट्विटरवर लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावेळी सोशल मीडियावर ही पोस्ट जोरदार व्हायरल झाली होती. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी डॅनियल वॅटने तिच्या इंस्टाग्रामवरुन अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती आणि अर्जुन जेवण करताना दिसत होते. अर्जुन आणि डॅनियल वॅट चांगले मित्र आहेत. 

डॅनियलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

डॅनियल वॅट हिने आतापर्यंत इंग्लंडकडून एकूण 93 वनडे आणि 124 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेमध्ये डॅनियल वॅटने 22.10 1489 च्या सरासरीने 1489 धावा केल्या आहेत आणि 27 बळीही घेतले आहेत. त्याचवेळी, तिने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 21.36 च्या सरासरीने 1966 धावा केल्या आहेत. तिने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 46 विकेट्सही घेतल्या आहेत.