क्रिकेट विश्वात खळबळ... बलात्कारप्रकरणी T20 च्या फलंदाजाला अटक

Sri Lanka Opener Danushka Gunathilaka Arrested T20 World Cup: बलात्कारप्रकरणी फलंदाजाला ऑस्ट्रेलियातून अटक  

Updated: Nov 6, 2022, 09:09 AM IST
क्रिकेट विश्वात खळबळ... बलात्कारप्रकरणी  T20 च्या फलंदाजाला अटक title=

Rape charges on Danushka Gunathilaka:  प्रसिद्ध फलंदाजाला बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दानुष्का गुनाथिलका (dhanushka gunathilaka) आहे. क्रिकेटपटूला अटक केल्यामुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. 

दानुष्का गुनाथिलका सिडनीतून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. रविवारी सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय आपल्या देशाला रवाना झाला. (danushka gunathilaka real life)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DANNY (@danushkagunathilaka)

गुणतिलकाला तीन आठवड्यांपूर्वी दुखापत झाली. त्यांच्या जागी अशेन बंडारा याला संघात घेण्यात आलं होतं. मात्र संघ व्यवस्थापनाने त्यांना घरी पाठवण्याऐवजी संघासोबतच ठेवलं होते.

29 वर्षीय महिलेने केली तक्रार
गुणतिलकाच्या विरोधात 29 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुणतिलका आणि पीडित महिलेची ओळख एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली. 

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणतिलकाला  बुधवारी संध्याकाळी महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याला रविवारी सकाळी सिडनीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील टीम हॉटेलमधून अटक करण्यात आली. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.