वॉर्नरचा पत्नी-मुलींसोबत या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड स्टाइल डान्स, पाहा व्हिडीओ

डेव्हिड वॉर्नरचा हा जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलाय का?

Updated: Jun 14, 2021, 03:06 PM IST
वॉर्नरचा पत्नी-मुलींसोबत या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड स्टाइल डान्स, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या फेस अॅपचा वापर करून वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करत असल्यानं चर्चेत आहे. डेव्हिडचा पत्नी आणि मुलींसोबत जबरदस्त डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची खूप चर्चा होत आहे.

वॉर्नरच्या कुटुंबाला क्रिकेट कूल म्हणूनही ओळखलं जातं. त्याने बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या गाण्यावर पत्नी आणि मुलींसोबत डान्स केला आहे. पत्नी कँडिस वॉर्नर आणि मुली देखील तितक्यात उत्साहानं या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सौदा खरा खरा या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. त्याचा व्हिडीओ वॉर्नरने पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियावर शेअर केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by David Warner (@davidwarner31)

लॉकडाऊनमधील थ्रोबॅक असं कॅप्शन देऊन वॉर्नरने हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ टिकटॉकवरील असल्याचा दिसत आहे. भारतात टिकटॉक बॅन केल्यानंतर त्याने हा व्हिडीओ आता इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या व्हिडीओला वॉर्नरच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

कोरोनामुळे 4 मे रोजी आयपीएलचे सामने स्थगित झाले. उर्वरित 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू अनुपस्थित असतील अशी चर्चा आहे. त्यामुळे आता वॉर्नर आयपीएलमधून बाहेर जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.