IND vs AUS : तिसऱ्या टेस्टपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का,स्टार खेळाडूला दुखापत

David Warner Ruled out test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ( Border Gavaskar Trophy) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा एका मागून एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने अभेद्य आघाडी घेतलीय.

Updated: Feb 21, 2023, 03:41 PM IST
IND vs AUS : तिसऱ्या टेस्टपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का,स्टार खेळाडूला दुखापत  title=

David Warner Ruled out test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ( Border Gavaskar Trophy) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा एका मागून एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने अभेद्य आघाडी घेतलीय. आता तिसऱ्या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे. या सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David warner)स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत टीम इंडियाचा विजय पक्का मानला जात आहे. (david warner ruled out of last two test due to elbow fracture ind vs aus 3rd test border gavasakr trophy) 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला 1 मार्चपासून सूरूवात होणार आहे. हा सामना मध्य प्रदेशच्या इंदूर येथील होलकर (Holkar Stadium) स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता असताना ऑस्ट्रेलियाला  (Australia) मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर(David warner) शेवटच्या दोन टेस्ट सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

वॉर्नरला दुखापत 

दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने (mohmmad siraj) टाकलेला बॉल डेव्हिड वॉर्नरच्या (David warner) डाव्या कोपऱ्याला लागला होता. यानंतर दोन ओव्हरनंतर  त्याच्या हेल्मेटला बॉल लागला होता. या घटनेनंतर त्याला दुखापत झाल्यासारखे वाटले आणि त्याने मैदान सोडले. त्याच्या जागी मॅट रेनशॉ याला पर्याय म्हणून निवडण्यात आले होते. 

वॉर्नरची (David warner) दुखापत ही चिंतेची बाब नव्हती, पण त्याच्या कोपऱ्याची दुखापत ही चिंतेची बाब होती.सुरुवातीला त्याला वाटले होते की फ्रॅक्चर इतके किरकोळ असेल की तो इंदूर कसोटीत भाग घेऊ शकेल. वॉर्नर सोमवारी रात्रीपर्यंत भारतातच होता आणि तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी तयार होत होता. पण त्याच्या वेदना आणि चाचण्यांनंतर तो अधिकृतपणे बाहेर पडला. त्यामुळे वॉर्नर (David warner) कुटुंबासह मायदेशी परतणार आहे.

डेव्हिड वॉर्नर (David warner) कोपऱ्याच्या फ्रॅक्चरमुळे गेल्या दोन कसोटींमधून बाहेर पडला आहे.वॉर्नर दुखापतीतून सावरण्यासाठी सिडनीला मायदेशी परतणार आहे.आता भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी तो पुन्हा संघात सामील होईल, अशी अपेक्षा आहे.