धोनी की रोहित... कोणता कर्णधार चांगला वाटतो? अष्टपैलू शिवम दुबेचे उत्तर एकदा ऐकाच

Rohit Sharma, MS Dhoni: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

Updated: Oct 7, 2024, 06:34 PM IST
धोनी की रोहित... कोणता कर्णधार चांगला वाटतो? अष्टपैलू शिवम दुबेचे उत्तर एकदा ऐकाच  title=
Photo Credit: PTI

Shivam Dube On Rohit Sharma: नुकतेच भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकले. याशिवाय रोहितने मुंबई इंडियन्ससाठी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) गणना जगातील महान कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसीच्या तीनही स्पर्धा जिंकल्या आहेत. याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद देखील पटकावले आहे. या दोन्ही दिगज्ज खेळाडूंच्या नेतृत्वाखाली शिवम दुबे खेळलेला आहे. यावरूनच एका शो मध्ये (The Great Indian Kapil Show) शिवम दुबेला धोनी आणि रोहित यांच्यामधून कोणता चांगला कर्णधार आहे हे निवडायला सांगितले. यावर शिवमने काय उत्तर दिले हे जाणून घ्या.  

कपिल शर्माचा प्रश्न 

भारतीय संघातील खेळाडूंनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये नुकतीच हजेरी लावली होती. या शो मध्ये कपिल शर्मा शिवमला विचारतो की, " शिवम तू रोहित आणि धोनी दोघांच्या टीममधून खेळला आहेस. तर कोणता कर्णधार चांगला वाटतो तुला?" यावर शिवमच्या आधी रोहित बोलतो "फस गया ये.." तर सूर्यकुमार यादव म्हणतो की "खूप अवघड प्रश्न विचारला आहे." कपिल शर्मा ने प्रश्न बदलून विचारलं की क्रिकेटमध्ये येण्याचे श्रेय कोणाला देशील? यावर शिवम दुबे उत्तर देतो की, " क्रिकेटमध्ये येण्याचे श्रेय मी माझ्या वडिलांना देतो. याशिवाय मी चेन्नईत खेळत असलो की भारतीय संघात त्या त्यावेळी माझ्यासाठी तेच सर्वोत्तम आहे." शिवमचं हे उत्तर ऐकून रोहितसह सर्वांनाच आनंद झाला. मग रोहित म्हणतो, "प्रश्नाचं उत्तर विचार करून आला आहेस का?" यावरही सगळेच हसतात. 

 

हे ही वाचा: IPLमध्ये विकले गेलेले सर्वात महागडे पाच भारतीय खेळाडू कोणते? जाणून घ्या

शिवम दुबे २०१९मध्ये भारतासाठी पदार्पण 

2019 मध्ये शिवम दुबेने भारतीय संघासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१९ पासून त्याने टीम इंडियासाठी 33 T20I सामन्यांमध्ये एकूण 448 धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर शिवमने भारताकडून 4 वनडे सामनेही खेळले आहेत. शिवम दुबेने T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आणि त्याने दमदार कामगिरी दाखवत 8 सामन्यात 133 धावा केल्या आहेत. 

हे ही वाचा: Video: रिंकू सिंगच्या हातावर पाच षटकारांची खूण, बघा स्टार क्रिकेटरचा अनोखा टॅटू

आयपीएलमध्ये शिवम दुबेची दमदार कामगिरी 

शिवम दुबे चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीचा भाग राहिला आहे. 2022 पासून चेन्नई सुपर किंग्जकडून शिवम दुबे खेळात आहे. आयपीएलमध्ये शिवमने 2022 मध्ये 289 धावा, आयपीएल 2023 मध्ये 418 धावा, आयपीएल 2024 मध्ये 396 धावा केल्या आहेत. मागील तीन सिजनमध्ये शिवमने  8 अर्धशतके झळकावली आहेत.