Asian games 2023 : पत्नीने सातासमुद्रापार फडकावला तिरंगा, गोल्ड मेडल जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकचं उर भरून आलं, म्हणतो...

Dipika Pallikal Win Gold medal Asian games 2023 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची पत्नी दीपिका पल्लीकल हिने सुवर्णपदाला गवासणी घातली आहे. 

Updated: Oct 5, 2023, 04:54 PM IST
Asian games 2023 : पत्नीने सातासमुद्रापार फडकावला तिरंगा, गोल्ड मेडल जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकचं उर भरून आलं, म्हणतो... title=
Dinesh Karthik, Dipika Pallikal, Asian games 2023

Dinesh Karthik wife Win Gold : सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत (Asian games 2023) भारताच्या दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) आणि हरिंदर पाल सिंह (Harinderpal Singh) या जोडीनं स्क्वॉश खेळातील मिश्र दुहेरी गटात चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकलं. चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी पहायला मिळत आहे. अशातच आता टीम इंडियाचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची पत्नी दीपिका पल्लीकल हिने सुवर्णपदाला गवासणी घातली आहे. 

दिनेश कार्तिकने आपल्या दमदार कामगिरीने क्रिकेट जगतात आपले नाव कमावले आहे. त्याच्या अप्रतिम फलंदाजी आणि यष्टिरक्षणामुळे टीम इंडियाने अनेक सामने जिंकले आहेत. सध्या तो संघाचा भाग नसला तरी त्याची पत्नी दीपिका पल्लीकलने परदेशी भूमीवर भारताचा नाव उंचावलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश मिश्र दुहेरीत मलेशियाचा पत्ता साफ करत पदक जिंकलं आहे. मात्र, याआधी दीपिका पल्लीकलने सांघिक स्पर्धेत 1 कांस्यपदक जिंकलं. यानंतर त्याने फायनल जिंकून भारताला सुवर्णपदक (Dipika Pallikal Win Gold medal) मिळवून दिलंय.

आणखी वाचा - Asian Games 2023 : गोल्डन बॉय Neeraj Chopra ने पुन्हा जिंकलं सुवर्णपदक!

दीपिका पल्लीकलने भारतासाठी सुवर्णपदक जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकचं उर भरून आलं. त्यानंतर दिनेश कार्तिकने ट्विटरवर वर दीपिका पल्लीकलचा व्हिडिओ शेअर केला अन् लिहिलं, "पुन्हा सोनेरी वेळ आली." खूप छान दीपिका आणि हरिंदर.”पिका पल्लिका हिने 2010 मध्ये पहिले पदक जिंकले होते. या काळात त्याने कांस्यपदक पटकावले होते. दीपिकाने 2014 मध्ये 1 रौप्य, 1 कांस्य पदक आणि 2018 मध्ये 1 कांस्य पदक जिंकले होते. 

पाहा पोस्ट

दरम्यान, चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाउंड संघानं तिरंदाजी प्रकारात सर्वोत्तम खेळी करीत सुवर्णपदकाची कमाई केली. एकाग्रतेचा कस लागणाऱ्या या खेळात ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर या तिघींनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवलं. आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताने आत्तापर्यंत 20 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य पदके जिंकली आहेत.