India Vs West Indies : 'दिनेश कार्तिक पाकिस्तानात जन्मला...', माजी क्रिकेटरच्या विधानाने चर्चेला उधाण

पाकिस्तानचा माजी क्रिकटर दिनेश कार्तिकबद्दल 'हे' काय बोलून गेला, त्याच्या विधानाची इतकी का चर्चा रंगलीय

Updated: Aug 1, 2022, 12:53 PM IST
India Vs West Indies : 'दिनेश कार्तिक पाकिस्तानात जन्मला...', माजी क्रिकेटरच्या विधानाने चर्चेला उधाण title=

त्रिनिदाद : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे. पाच सामन्यांच्या T20I मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतलीय. पहिल्या सामन्यात तुफानी खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकबाबत आता पाकिस्तानच्या खेळाडूने मोठं विधान केल आहे. या विधानाची खुप चर्चा रंगलीय.  

पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बटने दिनेश कार्तिकने मोठं विधान आलं आहे. "सुदैवाने, दिनेश कार्तिकचा जन्म भारतात झाला असता तर, त्याच्या वयात, तो पाकिस्तानचा देशांतर्गत क्रिकेट खेळू शकला नसता," असे बट यांनी म्हटले आहे. 

कार्तिकने यंदाच्या टी-२० विश्वचषकात फिनिशर स्पॉटसाठी मजबूत दावेदारी पेश केली आहे. कार्तिकने  टीम इंड़ियात फिनिशर म्हणून स्वत;ची जागा बनवल्याचे सलमान बटचे म्हणणे आहे. तसेच तो पुढे म्हणतो की, "सुदैवाने, दिनेश कार्तिकचा जन्म भारतात झाला. त्याच्या वयात, तो पाकिस्तानचा असला तर तो देशांतर्गत क्रिकेटही खेळू शकला नाही," असे बट यांनी विधान करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरचं टीका केली आहे. 

 युवा खेळाडूंचीही प्रशंसा 
सलमान बटने टीम इंडियातल्या युवा खेळाडूंचीही प्रशंसा केली आहे. “तरुण खेळाडू भारतासाठी चांगले खेळत आहेत. भारताने एक अप्रतिम संघ तयार केला आहे. शुभमन गिल एकदिवसीय सामन्यांमध्ये खूपच प्रभावी आहे. दिनेश कार्तिक फिनिशर म्हणून खेळत आहे. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यरसारखे फलंदाज दिवसेंदिवस सुधारत आहेत. अर्शदीप सिंग चांगली गोलंदाजी करत आहे. एकूणच या खेळाडूंमध्ये भरपूर प्रतिभा असल्याचे तो म्हणतोय.  

दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका बजावली होती. कार्तिकने 19 चेंडूत 41 धावांची खेळी केली. या खेळीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताला 190 पेक्षा जास्त लक्ष्य ठेवण्यात मदत झाली. त्याच्या या खेळीने त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.