Natasa Caught Hardik Pandya Redhanded: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून (Natasa Stankovic) घटस्फोट (Divorce) घेत असल्याचं 18 जुलै रोजी जाहीर केलं आहे. 4 वर्षांच्या संसारानंतर आम्ही विभक्त होत आहोत, असं या दोघांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे. तशी हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची मागील महिन्याभरपासून अधिक काळापासून चर्चा सुरु होती. या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे याची चर्चा आयपीएल 2024 च्या आधापासून म्हणजेच या वर्षाच्या सुरुवातीपासून होती. मात्र आता दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर एक धक्कादायक दावा केला जात आहे. हार्दिक पंड्याच्या बाहेरख्याली विचारांमुळे आणि कृतीमुळे नताशाने हार्दिकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हार्दिकवर लग्नबहाय्य म्हणजेच एक्ट्रा मॅरेटेयल अफेर ठेवल्यानंतर नताशाने रंगेहाथ पकडल्याचाही दावा करण्यात आला आहे.
हार्दिक आणि नताशा वेगळे झाल्याचं जाहीर करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं तर काहींनी टीका केली. मात्र 'रेडइट' या सोशल मीडिया माध्यमावर एका व्यक्तीने केलेल्या पोस्टमधील धक्कादायक दावा करण्यात आला आहे. सध्या या व्यक्तीने केलेल्या पोस्टचा स्क्रीन शॉट व्हायरल होत आहे. हार्दिक आणि नताशाच्या निकटवर्तीय व्यक्तीच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे.
"लोक नताशाला दोष देत असल्याचं पाहून वैतागलेला मी एक चाहता आहे. तुम्हाला यावर विश्वास बसो अथवा नाही पण नताशा आणि हार्दिक या दोघांना डेट करु लागले. मात्र नताशा गरोदर राहिल्यानंतर दोघांनी अगदी घाईत लग्न केलं. काहींसाठी ते काहीकाळ खरोखरच प्रेमात होते. मात्र नंतर हार्दिक पुन्हा त्याच्या जुन्याच मार्गाला लागला," असं पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे.
नक्की वाचा >> नताशाच्या पोटगीमुळे हार्दिक होणार कंगाल? 63 कोटी देणार की 31 कोटी? समजून घ्या गणित
मात्र 2023 च्या मध्यापासून हार्दिकने नशाताला फसवण्यास सुरुवात केली. तो इतर मुलींबरोबर असायचा. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये नताशाने त्याला रंगेहाथ पकडलं. तेव्हापासून त्यांच्यात वाद निर्माण झाले. हार्दिकने मुलाचा विचार करुन वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र नताशाने त्यात रस दाखवला नाही. तिने हार्दिकचा विषय सोडून दिला. आता नताशालाही हे नातं नको आहे. तिला या नात्यामधून बाहेर पडायचं आहे. दोघांनी एकमेकांच्या संमतीने वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटासंदर्भातील एनडीएअंतर्गत येणाऱ्या कागदपत्रांवर दोघांनीही स्वाक्षऱ्या केल्यात. एनडीए म्हणजे असा करार ज्यामध्ये दोघेहीजण एकमेकांच्या खासगी गोष्टी एकमेकांशी किंवा सार्वजनिकरित्या शेअर करत नाहीत. दोघांपैकी कोणालाही दोषी ठरवलं जाऊ नये यासाठी दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला. नताशाला मोठ्या प्रमाणात पोटगीही मिळणार आहे.

"ही माहिती अशा व्यक्तीकडून मिळाली आहे जी या दोघांच्या फार जवळची असून त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील यंत्रणेत काम करते आणि अनेकदा दोघांबरोबर असते. यापेक्षा अधिक काही सांगता येणार नाही," असंही या युझरने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
(Disclaimer - वरील माहिती सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे देण्यात आलेली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारचा दावा केला गेलेला नाही.)
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.