Hasan Ali : आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. चाहते या सामन्याची फार उत्सुकतेने वाट पाहत होते. आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला भारताविरूद्ध विजय मिळवणं शक्य झालेलं नाही. हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. अशातच पाकिस्तानचा खेळाडू हसन अलीने या हायव्होल्टेज सामन्यासंबंधी मोठं वक्तव्य केलं. यावेळी भम्र तोडण्यासाठी उत्सुक असल्याचं हसन अलीने म्हटलंय.
हसनने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड डिजीटलशी बोलताना सांगितले की, "विक्रम मोडायचे असतात आणि आम्ही 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करू शकत नाही हा भ्रम तोडण्यासाठी मी उत्सुक आहोत. मुळात हे त्यांचं घरचं मैदान असल्याने भारतावर दबाव असणार आहे. अशा मोठ्या सामन्यात नेहमीच दबाव असतो. पण आम्ही लवकर गती मिळवण्याचा आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हसन अली पुढे म्हणाला की, "ही जगातील सर्वोत्कृष्ट क्रीडा स्पर्धा आहे. टीम या खेळासाठी उत्साहित आहे. आम्ही अशा ठिकाणी खेळतोय जिथे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आम्ही सामन्याची वाट पाहत आहोत."
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सवर 81 रन्सने सहज विजय मिळवला. त्यानंतर हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध विक्रमी 345 रन्सचा यशस्वी पाठलाग करत सलद दुसरा विजय मिळवला. त्यामुळे एकंदरीतच पाकिस्तानच्या टीमची वर्ल्डकपमध्ये कामगिरी चांगली दिसून येतेय. तर पाकिस्तानला आजचा सामना टीम इंडियाशी खेळायचा आहे.
विश्वचषक स्पर्धेत सलग दोन विजय मिळवल्यानंतर टीम इडिया (Team India) आता विजयाची हॅट्रीक करण्यासाठी सज्ज झालीये. भारत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs Pak) दोन हात करणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी/ रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज