Eng vs Ind, 2nd Odi : टीम इंडियाला लॉर्ड्सवर मालिका विजयासह महारेकॉर्डची संधी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (गुरुवार 14 जुलै) दुसरा एकदिवसीय सामना (Eng vs Ind, 2nd Odi) खेळवण्यात येणार आहे.

Updated: Jul 14, 2022, 03:48 PM IST
Eng vs Ind, 2nd Odi : टीम इंडियाला लॉर्ड्सवर मालिका विजयासह महारेकॉर्डची संधी title=

लॉर्ड्स : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (गुरुवार 14 जुलै) दुसरा एकदिवसीय सामना (Eng vs Ind, 2nd Odi) खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे रोहितसेनेला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. टीम इंडियासाठी आणखी एका कारणामुळे हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. (eng vs ind 2nd odi team india have chance to win 100 match against england across all 3 formats at lords cricket ground)

टीम इंडियाला महारेकॉर्डची संधी

टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध 100 वा विजय साजरा करण्याची संधी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 अशा तिन्ही प्रकारात 99 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला ही दुसरी वनडे जिंकून मालिकेसह 100 वा विजय साकारण्याची भली मोठी संधी आहे. 

अशी आहे आकडेवारी 

टीम इंडिया-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत तिन्ही फॉर्मेटमध्ये 1933 पासून ते आतापर्यंत 2022 पर्यंत एकूण 257 सामने खेळवण्यात आले आहेत. या 257 पैकी 103 वेळा भारतीय संघाला इंग्लंडने पराभूत केलंय. 

तर टीम इंडियाने इंग्लंडवर 99 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आता या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया महारेकॉर्डला गवसणी घालणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

टीम इंडियाची लॉर्ड्सवरील कामगिरी

टीम इंडियाची लॉर्ड्सवरील (Lords Cricket Ground) कामगिरी ही निराशाजनक राहिली आहे. भारतीय संघाने 15 वर्षात लॉर्डसवर एकूण 3 सामने खेळले आहेत. यापैकी 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना हा टाय झाला आहे. याचाच अर्थ असा की टीम इंडियाला गेल्या 15 वर्षात लॉर्ड्सवर एकदिवसीय सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. 

यामुळे टीम इंडियाला एका विजयासह, मालिका, 100 वा सामना आणि लॉर्ड्सवर विजय अशी तिहेरी कामगिरी करता येणार आहे. यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच चांगल्या कामगिरीची अपेक्षाही असणार आहे.