Cricket News : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, विराटसह हे स्टार खेळाडू 'आऊट'

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा 18 सदस्यीय संघ जाहीर 

Updated: Jul 14, 2022, 02:48 PM IST
Cricket News : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, विराटसह हे स्टार खेळाडू 'आऊट' title=

Team India Tour : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा 18 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. दुखापतीमुळे विराट खेळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. आता तो  मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

विराट कोहलीबरोबरच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वन डेत बुमराहने 19 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. शस्त्रक्रियेनंतर केएल राहुलचं (KL Rahul) संघात पुनरागमन झालं आहे.

लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही (yuzvendra chahal) या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी रवी बिश्नोईला (R Bishnoi) संधी देण्यात आली आहे. तर रविचंद्रन अश्विनचेही (R Ashwin) संघात पुनरागमन झालं आहे. याशिवाय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, केएल राहुल आणि कुलदीपला फिटनेस चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे.

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

  Rohit Sharma (C), I Kishan, KL Rahul, Suryakumar Yadav, D Hooda, S Iyer, D Karthik, R Pant, H Pandya, R Jadeja, Axar Patel, R Ashwin, R Bishnoi, Kuldeep Yadav*, B Kumar, Avesh Khan, Harshal Patel, Arshdeep Singh.

वेस्टइंडीजविरुद्ध टी-20 मालिक

29 जुलै  - पहली टी-20 सामना
1 ऑगस्ट - दुसरी टी-20 सामना
2 ऑगस्ट - तीसरा टी-20 सामना
6 ऑगस्ट - चौथा टी-20 सामना
7 ऑगस्ट - पाचवा टी-20 सामना