धक्कादायक! वर्ल्ड कप विनर क्रिकेटरच्या घरावर हल्ला, CCTV व्हिडीओमध्ये कैद झाली घटना

James Vince house attacked: जेम्स विन्सच्या शेजाऱ्यांना देखील या घटनेमुळे जाग आली होती. घराचं आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

सौरभ तळेकर | Updated: Jul 17, 2024, 05:04 PM IST
धक्कादायक! वर्ल्ड कप विनर क्रिकेटरच्या घरावर हल्ला, CCTV व्हिडीओमध्ये कैद झाली घटना title=
England cricketer James Vince house attacked

CCTV footage viral Video: इंग्लंडचा क्रिकेटपटू आणि हॅम्पशायरचा कर्णधार जेम्स विन्सने (James Vince house attacked) याच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरावर वारंवार हल्ला होत असल्याचा खुलासा जेम्स विन्सने केलाय. सततच्या हल्ल्यामुळे विन्सच्या कुटूंबाला मूळ गाव साउथॅम्प्टन सोडावं लागलं होतं. या गावात ते गेल्या 8 वर्षांपासून राहत होते. हल्लेखोरांकडून त्याच्या घरावर आणि वाहनांवर हल्ला केला जात होता. विन्सने यावर आपबिती सांगितली.

काय म्हणाला James Vince?

माझ्या घरावर सात्त्याने हल्ला होत आहे. पहिला हल्ला 15 एप्रिल रोजी झाला होता. मी आणि माझी पत्नी अचानक वाजलेल्या अलार्ममुळे जागे झालो. अलार्मचा आवाज ऐकल्यानंतर मला धक्काच बसला. आमच्यासाठी खूप त्रासदायक घटना होती. काही दिवसानंतर पुन्हा घडल्याने आम्हाला असुरक्षित वाटत होतं. त्यामुळे आम्ही मुलांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून आम्ही घर सोडलं. पोलिस आले तोपर्यंत हल्लेखोर विध्वंस करून गायब झाले होते, असंही विन्सने म्हटलं आहे.

जेम्स विन्सच्या शेजाऱ्यांना देखील या घटनेमुळे जाग आली होती. घराचं आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांनी घराला अलार्म आणि कॅमेरे लावले होते, पण ते ऐनवेळी कामी आले नाहीत. पहिला हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला होता, असं जेम्स विन्सच्या शेजाऱ्यांनी म्हटलं आहे. हल्ल्यामागील कारण काय होतं? याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

दरम्यान, जेम्स विन्सच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याने त्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. एका आठवड्यातच दोन हल्ले झाल्याने परिसरात देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्याचे कुटुंबीय त्याचा सहकारी क्रिकेटपटू ख्रिस वुडच्या घरी जेवण करून परतत असताना दुसरा हल्ला झाल्याचं जेम्स विन्सने सांगितलं आहे.