नॉटिंघम : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना ((England vs India 1st Test) खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. परदेशी भूमीवर टीम इंडियाने या पहिल्या कसोटीत झोकात सुरुवात केली आहे. फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडला टीम इंडियाने पहिला धक्का दिला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज भोपळा न फोडता तंबूत परतला आहे. (England vs India 1st Test at Nottingham Jaspreet Bumrah lbw out Rory Burns in the fifth ball of the first over)
टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरमधील 5 व्या चेंडूवर बुमराहने रॉरी बर्न्सला ( Rory Burns) एलबीडबल्यू आऊट केलं. त्यामुळे इंग्लंडने धावांचं खातं उघडण्याआधी बुमराहने टीम इंडियासाठी विकेटचं खातं उघडलं.
अशी मिळाली पहिली विकेट
बुमराहने टाकलेला पाचवा चेंडू लेग स्टंपच्या लाईनवर पीच होऊन वेगाने आला. रोरी बर्न्सने तो चेंडू डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने रोरीला चकवा दिला. चेंडू जाऊन पॅडवर लागला. यावर जोरजदार अपील करण्यात आली. अंपायरने रोरीला बाद घोषित केलं. या निर्णयाला आव्हान म्हणून रोरीने डीआरएस घेतला. पण त्याचा हा प्रयत्न फसला. डीआरसमध्येही रोरीला बाद असल्याचं घोषित केलं. अशा प्रकारे भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळाली. बुमराहने पहिली विकेट मिळवून दिल्याने तो सध्या ट्विटरवर ट्रेंड होतोय. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
Bumrah is on
Nature is healing.#ENGvsIND pic.twitter.com/mZ47VmnNvY— Wisden India (@WisdenIndia) August 4, 2021
बुमराह गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरतोय. त्याला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याने आता पहिली विकेट घेत झोकात सुरुवात केली आहे. त्यामुळे बुमराह आता धमाका करेल, अशी आशा भारतीय चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
टीम इंडियात सलामीला रोहित शर्माला साथ देण्यासाठी केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. तर 4 वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरलाही संधी मिळाली आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | रोरी बर्न्स, डोमिनिक सिबली, जॅक क्रॉली, जो रूट (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, डॅनियल लॉरेन्स, जोस बटलर (विकेटकीपर), सॅम कुरेन, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.