मुंबई : टीम इंडिया (Team India) लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी (India Tour England 2021) रवाना होणार आहे. या दौऱ्यामध्ये विराटसेना आधी (World Test Championship Final 2021) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. तर यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका टीम इंडिया जिंकणार की इंग्लंड ट्रॉफी उंचावणार, याबाबतची भविष्यवाणी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने (Michael Vaughan) केली आहे. तसेच या सीरिजमध्ये सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंचीही नावंही सांगितली आहेत. (england will win test series against team india predict former england captain michael vaughan)
वॉर्न काय म्हणाला?
"ही कसोटी मालिका इंग्लंड जिंकेल. जेव्हा इंग्लंड भारताच्या दौऱ्यावर आलीये, तेव्हा भारतीय खेळाडूंनी आमच्यावर प्रहार केला आहे. तर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना इंग्लंडही भारतावर वरचढ ठरली आहे. इंग्लंड ही एकमेव टीम आहे ज्या संघाला मायदेशात ड्युक चेंडूने पराभूत करणं कठीण आहे", असं वॉर्नने स्पष्ट केलं.
"या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जो रुट सर्वाधिक धावा करतील. तर जसप्रीत बुमराह आणि ख्रिस वोक्स जास्त विकेट्स घेतील. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात रिषभ पंत आणि वेगवान गोलंदाज कायले जेमिन्सन यांच्यापैकी कोण वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल", असंही वॉर्न म्हणाला.
जेमिन्सनच्या कसोटी कारकिर्दीची शानदार सुरुवात झाली. तर यानंतर पंतच्याही टेस्ट कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात झाली. पंत क्रिकेट जगतातील चमकता तारा आहे. पंतने गेल्या काही महिन्यांमध्ये विशेषत: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे, असंही वॉर्न म्हणाला.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी मॅच, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी सामना, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी मॅच, 10 ते 14 सप्टेंबर.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल आणि रिद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट बंधनकारक).
राखीव खेळाडू : अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जन नगवासवाला.