दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का,डुप्लेसिस टीम बाहेर

साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस वन डे आणि टी २० सिरीजमधून बाहेर गेला आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 2, 2018, 11:31 PM IST
दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का,डुप्लेसिस टीम बाहेर  title=

केप टाऊन : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिके दरम्यान वन डे सिरीज सध्या सुरू आहे. दरम्यान साऊथ आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस वन डे आणि टी २० सिरीजमधून बाहेर गेला आहे. फिंगर एंजरीमूळे त्याला बाहेर बसावे लागत आहे.

एबी डिव्हीलियर्सही बाहेर  

 याआधी एबी डिव्हीलियर्स हा ३ वनडे साठी बाहेर झाला. यातून साऊथ आफ्रिकेचा संघ सावरत नाही तोपर्यत फाफ डु प्लेसिस बाहेर बसावे लागत आहे.

पुढच्या वन डेकडे लक्ष 

कसोटी सामन्यात भारताला हरविल्यानंतर साऊथ आफ्रिका संघाचा आत्मविश्वास वाढला होता. पण पहिल्याच वन डेत टीम इंडियाने आफ्रिकेला धूळ चारली.

त्यामूळे पुढच्या सामन्यात आफ्रिका संपूर्ण ताकदीने मैदानात उतरताना दिसेल. पुढच्या वनडेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.