श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट उद्यापासून, या खेळाडूंना संधी?

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे. कोलकताच्या ईडन गार्डन मैदानावर ही टेस्ट खेळवण्यात येणार आहे. 

Updated: Nov 15, 2017, 03:50 PM IST
श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट उद्यापासून, या खेळाडूंना संधी? title=

कोलकता : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे. कोलकताच्या ईडन गार्डन मैदानावर ही टेस्ट खेळवण्यात येणार आहे. पण या टेस्टमध्ये कोणाची निवड करायची या प्रश्नानं कोहली हैराण होण्याची शक्यता आहे.

ओपनिंग करण्यासाठी भारताकडे मुरली विजय, के.एल.राहुल आणि शिखर धवन हे तीन पर्याय आहेत. पण त्यापैकी फक्त दोघांचीच टीममध्ये निवड व्हायची शक्यता आहे. तर हार्दिक पांड्याला दोन टेस्टसाठी आराम दिल्यामुळे त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी मिळण्याची शक्यता आहे. भुवनेश्वरला संधी मिळाली तर मात्र रोहित शर्माला टीममध्ये स्थान मिळणं मुश्किल होणार आहे.

बॉलर्सवर नजर टाकली तर रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे तीन स्पिनर्स उपलब्ध आहेत. पण अश्विन आणि जडेजाची टेस्टमधली उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेता या दोघांचीच निवड निश्चित मानली जात आहे. फास्ट बॉलर्समध्ये मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा हे पर्याय आहेत. पण इशांत शर्माला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.

भारताविरुद्ध श्रीलंका तीन टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे. याआधी भारत श्रीलंका दौऱ्यावर असताना ३ टेस्ट, ५ वनडे आणि एक टी-२० अशा लागोपाठ ९ मॅच जिंकला होता. याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी विराट सेना पुन्हा मैदानात उतरेल.

पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीम

मुरली विजय, के.एल.राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान सहा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा