मुंबई : टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (World Test Championship final 2021) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन साउथम्पटनमध्ये (Southampton) करण्यात आले आहे. या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कंबर कसली आहे. पीच क्युरेटर अर्थात जे खेळपट्टी बनवतात, ते ही उत्सुक आहेत. साऊथम्पटनचे मुख्य पीच क्युरेटर सायमन ली (Simon Lee) आहेत. ली या सामन्यासाठी वेगवान, उसळी घेणारी तसेच फिरकी गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी बनवण्यास इच्छूक आहेत. (For whom will the pitch of WTC Final Team India or New Zealand Southampton be beneficial)
ली काय म्हणाले?
"या सामन्याचे आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी करण्यात आले आहे. त्यामुळे खेळपट्टी तयार करणं हे थोड्या फार प्रमाणात सोप्पं आहे. आम्हाला आयसीसीच्या नियमांचं पालण करायचं आहे. आम्ही अशी खेळपट्टी तयार करु इच्छितो जिथे सामना बरोबरीचा होईल. वेग आणि बाऊन्स असेल अशी पीच बनवायची इच्छा वैयक्तिक पातळीवर आहे. पण इंग्लंडमध्ये असं करण अवघड ठरु शकतं. त्याच कारण म्हणजे येथील बे-भरोशाचं वातावरण. पण या सामन्यासाठी वातावरण अनुकूल आहे. सामन्यादरम्यान ऊन असेल. त्यामुळे खेळपट्टीत वेग असेल" अशी इच्छा सायमन ली यांनी व्यक्त केली.
फिरकी गोलंदाजांना पीचकडून मदत
टीम इंडियाकडे रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजासारखे पट्टीचे आणि अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. सामना जस जसा पुढे चालेल तसतसं फिरकी गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरेल. "सामन्यादरम्यान हवामान पोषक असेल. त्यामुळे खेळपट्टी लवकरच कोरडी होते. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळते", असं ली यांनी स्प्षट केलं.
साऊथम्पटनमधील आकडेवारी
टीम इंडियाने साऊथम्पटनमध्ये आतापर्यंत एकूण 2 कसोटी सामने खेळले आहेत. दोन्ही वेळा भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने येथे एकही सामना खेळलेला नाही. 18-22 जून दरम्यान तापमान 20 अंश सेल्सियस तसेच पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
अभिनेत्री अनुष्का शर्माआधी किंग कोहलीचे या तरुणींसोबत होते अफेअर्स?