WTC 2021: विराट कोहली बॉलिंग करणार? व्हिडीओ शेअर करत BCCI म्हणाले...

विराट कोहली बॉलिंग करणार?  तुम्हाला काय वाटतं व्हिडीओ पाहून

Updated: Jun 13, 2021, 11:16 AM IST
WTC 2021: विराट कोहली बॉलिंग करणार? व्हिडीओ शेअर करत BCCI म्हणाले... title=

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.एका आठवड्यात हा सामना सुरू होणार असून आता त्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. टीम इंडियाच्या सरावा दरम्यानचे काही व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये एका व्हिडीओची खूप चर्चा होत आहे. याचं कारण म्हणजे चक्क या व्हिडीओमध्ये किंग कोहलीच्या हातात बॉल आहे. 

टीम इंडियाचा कर्णधार किंग कोहली बॉलिंग करणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. तर बीसीसीआयने तुमच्या पैकी किती जण योग्य सांगू शकतात असा प्रश्नार्थी कॅप्शन देऊन कोहलीच्या हातातील बॉल असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 12 जूनला सरावादरम्यान कोहली बॉलिंग करतानाच्या अॅक्शनमध्ये दिसला त्यानंतर तो गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार का अशा चर्चा सुरू झाल्या. 

विराट कोहली बॉलिंग करताना तर के एल राहुल बॅटिंग करताना दिसत आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याची तयारी टीम इंडिया करत आहे. हा सामना ड्युक बॉलनं खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी कोव्हिडच्या गाइडलाइन्स पाळून काही चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे.