नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमधल्या वाढलेल्या प्रदुषणाच्या मुद्द्यावरून गंभीरनं एक ट्विट करत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला टॅग केलं आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली. दिल्ली आणि एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वायू गुणवत्ता 'अति खराब' स्तरावर पोहोचली आहे. या वाढलेल्या प्रदुषणामुळे शहर धुरकट झालं आहे.
वायू प्रदुषणावरून केजरीवाल सरकारवर टीका करताना गंभीरनं ऋषी कपूर यांचं गाणं 'दर्दे दिल दर्दे जिगर'ची मदत घेतली आहे. 'दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्ली में जगाया AAP ने, पहले तो यहां ऑक्सीजन था, ऑक्सीजन भगाया AAP ने'. असं ट्विट गंभीरनं केलं आहे.
आमची पिढी तुमच्या खोट्या आश्वासनांमुळे धुरात जगत आहे. तुमच्याकडे डेंग्यू आणि प्रदुषण रोखण्यासाठी एका वर्षाचा कालावधी होता. पण तुम्ही दोन्हींपैकी एकालाही नियंत्रणात आणू शकला नाहीत याचं दु:ख आहे. जागो व्हा! असं ट्विट गंभीरनं केलं.