IND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध सामन्यात Hardik Pandya चा 'विराट' रेकॉर्ड, जाणून घ्या

हार्दिक पंड्याचा 'विराट' रेकॉर्ड, 'या' दिग्गज खेळाडूशी केली बरोबरी

Updated: Oct 23, 2022, 06:11 PM IST
IND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध सामन्यात Hardik Pandya चा 'विराट' रेकॉर्ड, जाणून घ्या title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने (Team india) 4 विकेट राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने 2021 च्या टी20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेतला आहे. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज सुरुवात केली आहे.  

हार्दिक पंड्याची उत्कृष्ट कामगिरी 

टीम इंडियाच्या (Team india) विजयात हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) मोलाची भूमिका बजावली आहे. हार्दिक पंड्याने बॉल आणि बॅटने उत्कृष्ट कामगिरी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. हार्दिक पंड्याने आधी बॉलिंगने कमाल दाखवली. त्याने पाकिस्तानचा (Pakistan) शादाब खान, हैदर अली आणि मोहम्मद नवाज या तीन खेळाडूंचे विकेट घेतले. 

पाकिस्तानने (Pakistan) दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची (Team india) फलंदाजी गडगडली होती. यावेळी कोहली आणि हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) सामना सावरला होता. हार्दिक पंड्याने 37 बॉलमध्ये 40 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 फोर आणि दोन गगनचुंबी सिक्सर मारले आहेत. या खेळीने त्याने विजयात मोलाची भूमिका बजावली.  

पंड्याचा रेकॉर्ड काय? 

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.पंड्याने पाकिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात तीन वेळा एका डावात 3 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) या बाबतीत श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टाय यांची बरोबरी केली आहे.याआधी श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टाय यांनी हा पराक्रम केला होता. त्याचबरोबर या यादीत न्यूझीलंडचा टिम साऊदी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने हा पराक्रम 4 वेळा केला आहे. 

दरम्यान मेलबर्नच्या मैदानावरील सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) 8 विकेट गमावून 159 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाने (Team india) 4 विकेट राखून मोठा विजय मिळवला. या विजयाने टीम इंडियाने देशवासियांना दिवाळी गिफ्ट दिले आहे.