WI vs IND : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( WI vs IND ) यांच्यामध्ये गुरुवारी पहिला टी-20 सामना रंगला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने ( West Indies ) भारताचा पराभव केला आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने अवघ्या 4 रन्सने भारताला धूळ चारली. पहिल्यांदा फलंदाजी करत 6 विकेट्स गमावत 149 रन्स केले. दरम्यान या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या ( Team India ) नाकीनऊ आले.
पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिज टीमने चमकदार कामगिरी करत भारताचा 4 रन्सने पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांनी चांगला खेळ केला. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या निकोलस पूरनने 41 रन्सची खेळी खेळली. कर्णधारपदाची खेळी खेळताना रोव्हमनने 150 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 32 बॉल्समध्ये 3 सिक्स आणि 3 फोर्ससह 48 रन्स केले. या दोन खेळाडूंशिवाय एकाही खेळाडूने 30 चा टप्पा गाठला नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 टी-20 सिरीजसाठी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यावेळी पंड्याचे पहिल्या सामन्यात गणितं चुकली आणि गोलंदाजांचा योग्य वापर करू शकला नाही. वेस्ट इंडिजने भारताविरुद्धचा पहिला T20 सामना 150 रन्सने जिंकला. या सामन्यात टीमला चांगली सुरुवात करता आली नाही. ओपनर शुभमन गिल यांना मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट गमावून बसला.
दुसरीकडे इशान किशनही 9 बॉल्समध्ये 6 रन्स करू शकला. मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. सूर्या 21 बॉल्समध्ये 21 रन्स केले. या सामन्यात डेब्यू केलेल्या तिलक वर्माने सामन्यात सिक्स ठोकून खातं उघडलं. टिळक चांगल्या लयीत दिसत होता. मात्र 22 बॉल्समध्ये 39 रन्स करून तो बाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही.
पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी दिसून आली. या सामन्यात युझवेंद्र चहलचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला होता. त्याने शानदार गोलंदाजी करत 2 विकेट्स घेतले. चहलने 3 ओव्हर्समध्ये 24 रन्स देत 2 विकेट्स घेतले. तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर 2 विकेट्स घेतले.