World Cup 2023 : हॅरिस रौफला का वाटते किंग कोहलीची भीती? स्वत:च सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!

ICC Cricket World Cup 2023 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराटकडून मार खाल्लेल्या याच हॅरिस रॉफने टीम इंडियाचा नेट बॉलर म्हणून देखील काम केलंय. रौफने स्वत: याचा किस्सा (Haris Rauf on Virat Kohli) सांगितला.

Updated: Oct 2, 2023, 03:38 PM IST
World Cup 2023 : हॅरिस रौफला का वाटते किंग कोहलीची भीती? स्वत:च सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा! title=
Haris Rauf on Virat Kohli

Haris Rauf on Virat Kohli : मागील वर्षातील टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (World Cup) भारत पाकिस्तान सामना सर्वांना आठवत असेल. विराट कोहलीने (Virat Kohli) हॅरिसला दोन खणखणीत सिक्स खेचत पाकिस्तानला पाणी पाजलं होतं. 'कोहली गोज डाऊन द ग्राऊंड... कोहली गोज आऊट ऑफ द ग्राऊंड', हर्षा भोगले यांचे अंगावर काटा आणणारे हे शब्द पाकिस्तानला आजही टोचत असतील. पाकिस्तानच्या प्रमुख गोलंदाजाला (Haris Rauf) अटॅक केला तर पाकिस्तानचे प्लेयर पॅनिक करतील, असं कोहलीचं लॉजिक होतं. मात्र, तुम्हाला माहिती का? विराटकडून मार खाल्लेल्या याच हॅरिस रॉफने टीम इंडियाचा नेट बॉलर म्हणून देखील काम केलंय. रौफने स्वत: याचा किस्सा सांगितला.

टीम इंजिया ज्यावेळी 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होती, तेव्हा सध्याचा पाकिस्तानचा स्टार गोलंदाज हॅरिस रौफ टीम इंडियासाठी नेट बॉलिंग करत होता. ऑस्ट्रेलियाच्या पीचवर शॉट सिलेक्शन अन् बाऊंसर बॉलिंगसाठी हॅरिसची भारतीय फलंदाजांना खूप मदत झाली होती. याच वेळी हॅरिसने विराटला बॉलिंग केली, त्याचा किस्सा हॅरिस रौफने (Haris Rauf on Virat Kohli) एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

काय म्हणाला हॅरिस रौफ?

जेव्हा मी भारताचा नेट बॉलर होतो आणि विराट कोहलीला गोलंदाजी करत होतो, तेव्हा त्याच्या बॅटला चेंडू नेमका कुठं आदळतो हे त्याला माहीत असायचं. तो मला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असल्याप्रमाणे खेळत होता, तेव्हा मला समजलं की, तो मोठा खेळाडू का आहे, असं हॅरिस रौफ म्हणतो. विराट कोहली मैदानात नेहमी फोकस असतो, त्यामुळे त्याच्या खेळातील एकाग्रता त्याला अधिक मजबूत करते, असं हॅरिस रौफ म्हणतो.

आणखी वाचा - Cricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!

दरम्यान, मला विराटची एकदा तरी विकेट घेयचीये, असं हॅरिस रौफ याने म्हटलं होतं. मात्र, अद्याप त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 14 ऑक्टोबर रोजी आमने सामने येणार आहे. त्यावेळी विराट कोहली अन् हॅरिस रौफ यांच्यात कडवी टक्कर पहायला मिळू शकते. आशिया कपमध्ये हॅरिस दुखापतग्रस्त झाल्याने त्याला विराट समोर खेळता आलं नाही. आता वर्ल्ड कपमध्ये कोण कोणावर भारी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.