Gujarat Titans Captain for IPL 2024 : गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आपल्या पदार्पणाच्या हंगामात आयपीएल जिंकून विक्रम नोंदवला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरातच्या सेनापतीला आपल्या ताफ्यात पुन्हा घेतलं आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात एकच चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता गुजरात टायटन्सने युवा शुभमन गिलच्या (Shubhman Gill) खांद्यावर संघाची जबाबदारी दिलीये. त्यावर आता क्रिकेट एक्सपर्ट आणि समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
हर्षा भोगले यांनी शुबमन गिलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ येण्याचं विश्लेषण केलं. त्यावेळी त्यांनी शुभमनला कॅप्टन करून घाई केल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यावेळी त्यांनी आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची नोंद घेतली अन् शुभमन गिलला मोलाचा सल्ला दिला आहे.
मला वाटतंय की, शुभमन गिलचं आयुष्य फारच लवकर पुढं जातंय. त्याचं यंदाचं वर्ष एक फलंदाज म्हणून उत्तम राहिलंय. त्याला हाच त्याचा गेम पुढे चालवायचा आहे. पुढील काही महिन्यांत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका आणि T20 विश्वचषकात त्याला त्याची जागा टिकून ठेवावी लागेल. त्यासाठी यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने जर केन विलियम्सनच्या कॅप्टन्सीखाली धडे घेतले असते तर त्याला 2025 च्या आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली असली, असं हर्षा भोगले यांनी म्हटलं आहे. त्यांनी पृथ्वी शॉ याच्यावर देखील भाष्य केलं.
I think life is moving a little too fast for Shubman Gill. He has had a great year as a batter and he needs to take that next step forward in the next few months with a test series in South Africa and a T20 World Cup where he has competition for his place. It might have…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) November 27, 2023
दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलं असल्याने पृथ्वी शॉ थोडा भाग्यशाली ठरला आहे. कारण त्याने आपण हाताळण्यास फार कठीण असल्याची प्रतिमा तयार केली आहे. तो एक स्फोटक फलंदाज असल्याने आपली ही प्रतिमा बदलण्यासाठी तो मेहनत घेईल अशी आशा आहे, असं हर्षा भोगले म्हणाले आहेत.
कायम ठेवलेले खेळाडू : अभिनव सदारंगनी, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा.
सोडलेले खेळाडू : अल्झारी जोसेफ, दासुन शनाका, केएस भरत, ओडियन स्मिथ, प्रदीप सांगवान, शिवम मावी, उर्विल पटेल, यश दयाल.