कर्णधार म्हणून मी कसा...; विजयानंतर गंभीरने घेतलं अय्यरचं क्रेडिट? नेमकं काय म्हणाला श्रेयस?

Gautam Gambhir: इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये पोहोचली तेव्हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अय्यरला गौतम गंभीरला स्वतःपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय.

सुरभि जगदीश | Updated: May 27, 2024, 10:08 AM IST
कर्णधार म्हणून मी कसा...; विजयानंतर गंभीरने घेतलं अय्यरचं क्रेडिट? नेमकं काय म्हणाला श्रेयस? title=

KKR vs SRH IPL 2024 Final, Gautam Gambhir: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये कोलताना नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकात्याच्या टीमने आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. एकीकडे आनंदाचं वातावरण असताना सोशल मीडियावर मात्र गौतम गंभीर काही नेटकरी निशाणा साधताना दिसतायत. एक मेंटॉरने आयपीएल नाही जिंकवली अशा आशयाचे काही पोस्ट सोशल मीडियावर आता व्हायरल होतायत. त्यामुळे आता श्रेयस अय्यरचं क्रेडीट गंभीर घेतोय का असा प्रश्नही उपस्थित होतोय. यावर स्वतः श्रेयस अय्यने मोठं विधान केलं आहे.

इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये पोहोचली तेव्हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अय्यरला गौतम गंभीरला स्वतःपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय. श्रेयसच्या नेतृत्वाखालील KKR टीमने रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलच्या 17व्या सिझनमध्ये अंतिम सामन्यात विजय मिळवला. याआधी 2020 मध्ये श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने या लीगची अंतिम फेरी गाठली होती.

श्रेयस अय्यरला क्रेडीत मिळत नाहीये?

श्रेयस अय्यरला विचारण्यात आलं होतं की, कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीवर फारसं लक्ष दिलं गेलं नाही. याचं उत्तर देताना अय्यर म्हणाला की, या गोष्टींना तुम्ही (मीडियाने) अतिशय वाढवून सर्वांसमोर आणल्या आहेत. कर्णधार म्हणून मी कसा वागलो हे तुम्हीच ठरवायचे आहे.

गंभीरला 'मेंटॉर' म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल विचारलं असता, श्रेयसने त्याचं वर्णन T-20 फॉरमॅटमधील खेळातील सर्वोत्तम समजदारांपैकी एक म्हणून केलं. अय्यरच्या म्हणण्यानुसार, 'गौतम गंभीरबाबत मला वाटतं की, त्याला हा खेळ कसा खेळला जातो याबद्दल खूप माहिती आहे. केकेआरसोबत पहिली दोन विजेतेपदं जिंकली आहेत. प्रतिस्पर्धी टीमविरुद्ध कसं खेळायचे आहे या दृष्टीने त्याची रणनीती एकदम योग्य आहे.

10 वर्षांपासून ट्रॉफीची वाट पाहत असलेली KKR च्या टीमने अखेर आयपीएल 2024 जिंकली. या विजयानंतर टीमचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडितही चर्चेत आले. पंडित हे भारतीय देशांतर्गत सर्किटमधील सर्वोत्तम प्रशिक्षक मानले जातात. यावेळी वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर यांनी केकेआरच्या विजयाचे श्रेय सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यालाही दिलंय.

अभिषेक नायर 2018 पासून केकेआरच्या ताफ्यात आहे. वरुण चक्रवर्ती इंटरव्ह्यूनंतर म्हणाला, हा सिझन माझ्यासाठी खूप चांगला होता. मी खूप आनंदी आहे, याचे संपूर्ण श्रेय अभिषेक नायरला जातं. ज्याप्रकारे त्याने फ्रेंचायझीसाठी काम केलं आहे. काही योगदानांकडे लक्ष दिलं जातं नाही. मला खात्री आहे की, त्याच्या कामाची दखल घेतली जाईल.