...तर पुन्हा कॉलर पकडीन, युवराजची रोहितला धमकी

२०१८ सालच्या आयपीएलदरम्यान युवराज सिंगनं रोहित शर्माची कॉलर पकडली होती.

Updated: Dec 12, 2018, 10:20 PM IST
...तर पुन्हा कॉलर पकडीन, युवराजची रोहितला धमकी title=

मुंबई : २०१८ सालच्या आयपीएलदरम्यान युवराज सिंगनं रोहित शर्माची कॉलर पकडली होती. आता पुन्हा एकदा युवराजनं रोहितला अशीच कॉलर पकडण्याची धमकी दिली आहे. वाढदिवसानिमित्त रोहित शर्मानं युवराज सिंगला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांवर प्रतिक्रिया देताना युवराजनं रोहितला ही धमकी दिली आहे. जर पुन्हा ३७ रनवर आऊट झालास, तर अशाच पद्धतीनं कॉलर पकडीन, असं ट्विट युवराज सिंगनं केलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍडलेड टेस्टमध्ये रोहित शर्मा पहिल्या इनिंगमध्ये ३७ रनवर आऊट झाला होता. आधीच्या बॉलला सिक्स मारल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बॉलला सिक्स मारण्याचा प्रयत्न रोहितनं केला आणि यामध्ये तो कॅच आऊट झाला. रोहित शर्माच्या या बेजबाबदार शॉटमुळे त्याच्यावर चौफेर टीका झाली होती. रोहित शर्मा हा माझ्यासाठी शेवटची टेस्ट खेळला आहे, अशी बोचरी टीका ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल यांनी केली होती. यानंतर आता युवराज सिंगनंही रोहितवर निशाणा साधला आहे.

आयपीएलसाठी युवराजचा लिलाव

आयपीएलमध्ये मागच्यावर्षी पंजाबकडून खेळलेला युवराज सिंग यावर्षी पुन्हा लिलावात उतरणार आहे. पंजाबच्या टीमनं युवराजला टीममध्ये कायम ठेवलं नाही. १ कोटी रुपये ही युवराजची बेस प्राईज आहे. २०१५ साली युवराज सिंग तब्बल १६ कोटी रुपयांना विकला गेला होता. तर २०१८ मध्ये युवराजची बेस प्राईज २ कोटी रुपये होती. १८ डिसेंबरला जयपूरमध्ये आयपीएलचा लिलाव होणार आहे.