मुंबई : टीम इंडिया 12 मार्चला श्रीलंका विरुद्ध दुसरा कसोटी (IND vs SL 2nd Test) सामना खेळणार आहे. या दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन आणि मुंबईकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आयसीसीने (ICC) गूड न्यूज दिली आहे. आयसीसी दर महिन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला 'आयसीसी प्लेअर ऑफ द मन्थ' (Icc Player Of The Month) या पुरस्कराने गौरवतं. या फेब्रुवारी महिन्याच्या पुरस्कारासाठी निवडक खेळाडूंपैकी 3 खेळाडूंना नामांकन दिलं आहे. (icc player of the month nominations in uae vriitya aravind team india shreyas iyer and nepal dipendra sing airee)
त्यापैकी श्रेयसला या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे. श्रेयस व्यतिरिक्त यूएईच्या वृत्य अरविंद आणि नेपाळच्या दीप्रेंद्र सिंग एरीला पुरुष गटातून नामांकन मिळालं आहे.
श्रीलंका विरुद्ध धमाका
श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन नवख्या क्रिकेटर्सना संधी देण्यात आली. यामध्ये सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे श्रेयसला या टी 20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. श्रेयसने या संधीचं सोनं केलं.
श्रेयसने या तिन्ही सामन्यात सलग 3 अर्धशतक ठोकली. विशेष म्हणजे श्रेयस तिन्ही वेळा नाबाद राहिला. श्रेयसने या मालिकेत एकूण 204 धावा केल्या.
श्रेयस भारतात सलग 3 अर्शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला. तसंच श्रेयसने 3 सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला. श्रेयसला या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं.
यानंतर श्रेयसने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत 27 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीची दखल घेत आयसीसीने श्रेयसला नामांकन दिलंय. त्यामुळे आता श्रेयस उर्वरित दोघांना पाणी पाजत 'आयसीसी प्लेअर ऑफ द मन्थ' पुरस्कार पटकावणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.