मुंबई : सध्याचा टी-20 चा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यशस्वी शिखरावर आहे. आयसीसीच्या लेटेस्ट क्रमवारीत सूर्यकुमार यादवची चमक कायम आहे. बुधवारी जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये त्याचं दुसरं स्थान कायम आहे. मुख्य म्हणजे टॉप 10 मध्ये सूर्यकुमार हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. यासोबतच कुलदीप यादवने वनडेच्या क्रमवारीत झेप घेतलीये.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या नुकत्याच झालेल्या T20 सिरीजमध्ये सर्वाधिक रन्स करणारा सूर्यकुमार हा पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान च्या मागे आहे. सूर्यकुमारला 838 पॉईट्स आहेत. यानंतर लोकेश राहुल आणि अनुभवी विराट कोहली हे 13व्या आणि 14व्या तर कर्णधार रोहित शर्मा 16व्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉन्वेने टॉप 5 फलंदाजांमध्ये एन्ट्री केली आहे. कॉन्वेने बांगलादेशविरुद्ध नाबाद 70 आणि पाकिस्तानविरुद्ध नाबाद 49 रन्स केले. तो फलंदाजी क्रमवारीत 760 पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. कॉन्वेने ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मलान यांना पछाडलंय.
दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात 4 विकेट्स पटकावणारा स्पिनर कुलदीप यादव सात स्थानांनी वरच्या 25 मध्ये पोहोचलाय. तर धोकादायक गोलंदाज जसप्रीत बुमराह भारताचा अव्वल गोलंदाज म्हणून 10व्या स्थानावर कायम आहे. याशिवाय युझवेंद्र चहलने त्याचं 20 स्थान कायम ठेवलं आहे.