टेस्ट आणि वनडेत नंबर 1, न्यूझीलंड T20 WC जिंकून टी 20मध्येही अव्वल स्थानी झेप घेणार?

टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup 2021 Final) फायनलमध्ये रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे.  

Updated: Nov 13, 2021, 05:51 PM IST
टेस्ट आणि वनडेत नंबर 1, न्यूझीलंड T20 WC जिंकून टी 20मध्येही अव्वल स्थानी झेप घेणार? title=

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup 2021 Final) फायनलमध्ये रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांकडे पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. मात्र न्यूझीलंडसाठी हा सामना फार विशेष आहे. कारण न्यूझीलंडने 2021 मध्येच आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा दिंकली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला टी 20 वर्ल् कप जिंकून डबल धमाका करण्याची संधी आहे. (icc t 20 world cup 2021 final australia vs new zealand at Dubai International Cricket Stadium)

न्यूझीलंड गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. या कारणामुळेच न्यूझीलंड वनडे आणि कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.  मात्र न्यूझीलंड टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यास रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहचेल का, याबाबत आपण जाणून घेऊयात. 

न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत पहिल्या, टीम इंडिया दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे. तर वनडेमध्ये न्यूझीलंड पहिल्या, इंग्लंड दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र न्यूझीलंड टी 20 मध्ये चौथ्या स्थानी आहे. यामध्ये इंग्लंड नंबर 1 आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानी आहे. तर यानंतर पाकिस्तान आहे.  

न्यूझीलंड टी 20 मध्ये नंबर 1 होणार? 

अंतिम सामन्यात जिंकल्यास न्यूझीलंड चॅम्पियन ठरेल. मात्र न्यूझीलंडला टी 20 मध्ये नंबर 1 होता येणार नाही. कारण न्यूझीलंड ताज्या आकडेवारीनुसार क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. अशात वर्ल्ड कप जिंकल्यास रेटिंग्स पॉइंट्समध्ये वाढ होईल. मात्र अव्वल स्थानी इंग्लंडच राहिल. 

टी 20 वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडने या तिन्ही सामन्यात विजय मिळवल्यास त्यांना नंबर 1 होण्याची संधी निर्माण होईल.