वर्ल्ड कपमधल्या फ्लॉप कामगिरीनंतर पीसीबी ॲक्शन मोडवर, पाकिस्तान संघातून यांची हकालपट्टी?

ICC World Cup 2023 Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी अतिशय सुमार झाली. नऊ सामन्यांपैकी तब्बल पाच सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला, त्यामुळे सेमीफायनलआधीच पाकिस्तान गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तानच्या फ्लॉप कामगिरीवर आता पीसीबी अॅक्शन मोडवर आलीय. 

राजीव कासले | Updated: Nov 14, 2023, 05:12 PM IST
वर्ल्ड कपमधल्या फ्लॉप कामगिरीनंतर पीसीबी ॲक्शन मोडवर, पाकिस्तान संघातून यांची हकालपट्टी? title=

Pakistan Team Coaching Staff: आयसीसी विश्वचषकातील फ्लॉप कामगिरीचा फटका पाकिस्तान संघाला (Pakistan Cricket Team) बसणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये (Coachin Staff) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पाकच्या कोचिंग स्टाफमधून परदेशी स्टाफची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधल्या एका न्यूज चॅनलने दिलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपातकालिन बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाकिस्तान संघाच्या सर्व परदेशी प्रशिक्षकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय होऊ शकतो.

पाकिस्तान संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बहुतांश परदेशी चेहरे आहेत. यात संघाचे संचालक मिकी आर्थर (Mickey Arthur), संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रांट ब्रेडबर्न, बॅटिंग प्रशिक्षक अँड्र्यू पुतीक यांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या बॉलिंग प्रशिक्षकपदाची जबाबादारी दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज गोलंदाज मॉर्नी मॉर्केल यांच्याकडे होतं. पण वर्ल्ड कपमधल्या पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यांनी आपल्या पदाची राजीनामा दिला. आता इतर कोचिंग स्टाफचीही सुट्टी होणार असल्याचं बोललं जात आहे. 

वर्ल्ड कप 2023 मध्ये फ्लॉप शो
वर्ल्ड कप 2023 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या  पाकिस्तान संघाची कामगिरी अतिशय सुमार झाली. विश्वचषक स्पर्धेच्या आधी पाकिस्तान संघाला विजेतेपदाचा दावेदार मानला जात होतं. पण पाकिस्तानचा संघ सेमीफायनलही गाठू शकला नाही. आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानने सलग दोन सामने जिंकत दमदार सुरुवात केली. पण तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि पाकच्या कामगिरीलाच ग्रहण लागलं. त्यानंतर पाकिस्तान संघ एकामागोमाग एक सामने हरत गेला. शेवटच्या काही सामन्यात चांगली कामगिरी करत सेमीफायनलच्या शर्यतीत आपला दावा ठोकला. पण नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तान संघ मागे पडला आणि स्पर्धेतूनच बाहेर फेकला गेला. 

स्टार खेळाडू खेळलेच नाहीत
पाकिस्तान संघाला सर्वात मोठा फटका बसला तो संघातील स्टार खेळाडूंच्या फ्लॉप कामगिरीचा. स्पर्धेत स्टार खेळाडूंच्या बॅटमधून धावांच निघाल्या नाहीत. सलामीचा फलंदाज इमाम उल हक आणि उपकर्णधार शादाब खानने निराशा केली. तर कर्णधार बाबर आझमही काही सामन्यांचा अपवाद वगळता इतर सामन्यात फ्लॉप ठरला. 

स्पेशल फिरकी गोलंदाजांची कमी
पाकिस्तान संघाला यंदाच्या विश्वचषकात स्पेशल फिरकी गोलंदाजांची कमी जाणवली. फिरकीला साथ देणाऱ्या भारतीय खेळपट्टीचा पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांना फायदा उचलता आला नाही. तर पाकिस्तान संघााचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी, हारिस रौफने या स्पर्धेत खोऱ्याने धावा दिल्या.