भारत-न्यूझीलंड सेमीफानयल पाहण्यासाठी 'तो' येतोय, चाहत्यांना पाहायला मिळणार डबल धमाका

ICC World Cup Ind vs NZ Semi Final : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल खेळवली जाणार असून जगभरातील क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता. आहे. ज्या मैदानावर टीम इंडियाने 2011 विश्वचषक जिंकला त्याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल खेळवली जाणार आहे.

राजीव कासले | Updated: Nov 14, 2023, 03:02 PM IST
भारत-न्यूझीलंड सेमीफानयल पाहण्यासाठी 'तो' येतोय, चाहत्यांना पाहायला मिळणार डबल धमाका title=

ICC World Cup Ind vs NZ Semi Final : ऐन दिवाळीत भारतीय क्रिकेट चाहत्यांना डबल धमाका पाहायला मिळणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आयसीसी विश्वचषकतली पहिली सेमीफायनल बुधवारी 15 नोव्हेंबरला खेळवली जाणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि न्यूझीलंडचा (India vs New Zealand) संघ आमने सामने असतील. या सामन्याला आता काही तासांचा अवधी राहिला असून चाहत्यांची उत्सुकता वाढू लागली आहे. मुंबईच्या वानखेडे (Mumbai Wankhede) स्टेडिअमची तिकिंट आधीच हाऊसफूल झालीत. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना आणखी एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे.

स्टार खेळाडू हजर राहाणार
भारत-न्यूझीलंड सेमीफायनलआधी जर्मनचा स्टार फुटबॉलपटू थॉमस मूलरने टीम इंडियाची जर्सी परिधआन करत व्हिडिओ शेअर केला होता. आता इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम  (David Beckham) सेमीफायनलसाठी चक्क वानखेडे स्टेडिअमवर हजर राहाणार आहे. डेव्हिड बेकहॅम संपूर्ण सामना पाहाणार आहे. बेकहॅमशिवाय अनेक दिग्गज सेमीफायनलचा सामना पाहण्यासाठी हजर राहाणार आहेत. 

मॅनचेस्टर युनायटेड आणि रियल माद्रिदच्या या माजी स्टार फुटबॉलपटूचं भारतात प्रचंड फॅन फॉलोीईंग आहे. अशात बेकहॅम वानखेडे मैदानावर उपस्थित राहाणार असल्याने चाहत्यांना डबल धमाका पाहिला मिळणार आहे. डेव्हिड बेकहॅम गुडविल अॅम्बेसेडर म्हणून उपस्थित असणार आहे. 

15 नोव्हेंबरला सेमीफायनल
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान 15 नोव्हेंबरला आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या स्पर्धेत टीम इंडियाला सलग नऊ मॅच जिंक अपाराजित राहिली आहे. तर न्यूझीलंड संघ नऊ पैकी पाच सामने जिंकला जिंकला असून पॉईंटटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर होता. लीग सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. आता सेमीफायनलमध्ये विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी टीम इंडिया पुन्हा सज्ज झालीय.

पाऊस आला तर काय?
दरम्यान, क्रिकेट चाहत्यांना एक वेगळीच चिंता सतावतेय. सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यात पाऊस आला तर काय होणार? या प्रकरणात आयसीसीने दोन्ही सेमीफायनल आणि फायनलसाठी एक-एक दिवस रिझर्व्ह ठेवला आहे. म्हणजे भारत-न्यूझीलंडचा पहिला सामना 15 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. पावसामुळे हा सामना त्या दिवशी खेळला गेला नाही तर हाच सामना 16 नोव्हेंबरला होईल. तर 16 नोव्हेंबरचा दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलियाचा दुसरा सेमीफायनलचा सामना रद्द झाला तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबरला खेळवला जाईल. तर 19 नोव्हेंबरला होणार फायनलच्या  सामन्यासाठी 20 नोव्हेंबरचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. राखीव दिवसालाही सामना होऊ शकला नाही तर पॉईंटटेबलमध्ये सर्वात वरती असलेल्या संघाला विजयी घोषित केलं जातं.