पीएम मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, अंबानी आणि 'हे' स्टार्स, पाहा वर्ल्ड कप फायनलची गेस्ट लिस्ट

IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. अंतिम सामना पाहण्यासाठी मोदी स्टेडिअमची तिकिटं विकली गेलीत. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहाणार आहेत. 

राजीव कासले | Updated: Nov 17, 2023, 08:37 PM IST
पीएम मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, अंबानी आणि 'हे' स्टार्स, पाहा वर्ल्ड कप फायनलची गेस्ट लिस्ट title=

ICC Cricket World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियात (India vs Australia Final) अंतिम सामना खेळवला जाणार आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्याची चुरस पाहिला मिळणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया (Team India) तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. करोडो भारतीय प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. टीम इंडियाला चिअर करण्यासाठी लाखो क्रिकेट चाहते अहमदाबादमध्ये दाखल झालेत. पण त्याचबरोबर विविध क्षेत्रातील दिग्गजही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. 

पीएम मोदी उपस्थित राहाणार
भारत-ऑस्ट्रेलया अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता सवा लाखांची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अंतिम सामना पाहाण्यासाठी उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्ससुद्धा अहमदाबादमध्ये येण्याची शक्यता आहे. 

हे दिग्गज राहाणार उपस्थित
याशिवाय राजकीय, उद्योग, बॉलिवूड, क्रिकेटमधले दिग्गजही सामना पाहाण्यासाठी हजर राहाणार आहेत. 1983 मध्ये पहिला विश्वचषक आणि 2011 मध्ये दुसरा विश्वचषक मिळवून देणारे भारताचे महान कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीसुद्धा भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हजर राहाणार आहेत. याशिवाया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गृहमंत्री अमित शाह, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या, राजीव शुक्ला उपस्थित राहतील. याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी आणि उद्योगपती गौतम अदानी उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. 

बॉलिवूड स्टार्सची हजेरी
मुंबईत झालेल्या भारत-न्यूझीलंड सेमीफायनलसाठी बॉलिवूड स्टार्सने मोठ्या प्रमाणावर हजेरील लावली होती. यात रणबीर कपूर, शाहीद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, जॉन अब्राहम, विकी कौशल आणि अनुश्का शर्माचा समावेश होता. हे सर्व स्टार्स अंतिम सामना पाहण्यासाठीदेखील उपस्थित राहाणार आहेत. याशिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत, अमिताभ बच्चन, सुनील शेट्टी, शाहरुख खान, आमिर खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, कतरीना कैफसह बॉलिवूडचे अनेक स्टार्स टीम इंडियाल चिअर करण्यासाठी स्टेडिअममध्ये जाऊ शकतात. 

अहमदाबादलमधल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 19 नोव्हेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल.