IND vs Aus : रविद्र जडेजाचं दमदार कमबॅक, कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं

 India vs Australia 1st Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या बॅटसमनना बॅकफुटवर ढकलंल आहे. त्यात दुखापतीत परतलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) तर  शानदार कमबॅक करत मैदानात वापसी केली आहे.

Updated: Feb 9, 2023, 04:07 PM IST
 IND vs Aus  : रविद्र जडेजाचं दमदार कमबॅक, कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं title=

India vs Australia 1st Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या बॅटसमनना बॅकफुटवर ढकलंल आहे. त्यात दुखापतीत परतलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) तर  शानदार कमबॅक करत मैदानात वापसी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. जडेजा, शमी आणि सिराजच्या या भेदक गोलंदाजीमुळे नागपूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली आहे. 

 

हे ही वाचा : रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू, दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक

 

शमी-सिराज जोडीची कमाल

नागपूर टेस्टमध्ये (Nagpur Test) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र ऑस्ट्रेलियाची सुरुवात हवी तशी चांगली झाली नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर फंलदाजी ढेपाळली. मोहम्मद शम्मीने पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजा अवघ्या 1 धावा करून LBW आऊट झाला. त्यानंतर मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला बोल्ड केले. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर वॉर्नर बाद झाला. 

जडेजाने घेतले 3 बळी

दुखापतीतून सावरलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) मैदानात चांगली वापसी केली आहे. जडेजाने एकट्याने ऑस्ट्रेलियाचे 3 विकेट घेतले आहेत. 36 व्या ओव्हरमध्ये जडेजाने लागोपाठ दोन विकेट घेतल्या. जडेजाने पहिल्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर मार्नस लाबूशेनला (Marnus Labuschagne) स्टम्पिंग केले. के एस भरतने उत्कृष्ट रितीने ही विकेट घेतली. लाबूशेन 49 धावा करून आऊट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मॅट रेनशॉला खाते ही उघडू न देता जडेजाने LBW आऊट  केले. तसेच मैदानात टीचून खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथला देखील जडेजाने पव्हेलियन धाडले. जडेजाच्या बॉलने स्मिथला चकवा देत क्लिन बोल्ड केले. अशाप्रकारे जडेजाने मैदानात वापसी करत तीन विकेट घेतले. 

दरम्यान बातमी लिहेपर्यंत मैदानात पीटर हॅन्डसकॉम्ब 20 धावा आणि अॅलेक्स कॅरी 11 धावावर खेळत आहे. ऑस्टेलियाने 5 विकेट गमावून 130 धावांचा टप्पा गाठलाय.

दोन्ही संघाची प्लेइंग XI

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड.