नागपूर : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील (IND vs AUS) तीन टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना आज शुक्रवारी नागपुरात रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. सध्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 0-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडिया (Team India) देखील विजय मिळवून आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापुर्वी दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन समोर आली आहे. या प्लेईंग इलेव्हनमध्ये (playing xi) कोणत्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे ते जाणून घेऊयात.
टीम इंडिया आज नागपुरात ऑस्ट्रेलिया विरुद्ध (IND vs AUS) मालिकेतील दुसरा टी-20 सामना खेळणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी 'करो किंवा मरो'चा असणार आहे. या सामन्यात त्यांची नजर फक्त विजयावर असणार आहे.कारण पराभव झाला तर मालिकाही भारताच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडिय़ाला विजय मिळवण्यासाठी या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
मोहालीतल्या सामन्यात कुठे चुक झाली?
मोहालीतील पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पंड्याच्या 71 धावांच्या झंझावाती खेळीने आणि सलामीवीर केएल राहुलच्या अर्धशतकामुळे टीम इंडियाने 6 बाद 208 धावा केल्या होत्या. त्या अर्थाने ही धावसंख्या बऱ्यापैकी होती. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजीने निराशा केली. भारतीय बॉलर्सना या मोठ्या लक्ष्याचा बचावही करता आला नाही आणि ऑस्ट्रेलियाने चार चेंडू राखून सामना जिंकला. अक्षर पटेलने 3 आणि उमेश यादवने 2 विकेट्स घेतले. पण अनुभवी बॉलर भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलने निराशा केली. भुवनेश्वरने 52 धावा दिल्या तर हर्षल पटेलनेही 49 धावा दिल्या होत्या.
'या' अनुभवी बॉलरला मिळणार संधी
दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर असलेला स्टार बॉलर जसप्रीत बुमराहचे (jasprit bumrah) पुनरागमन होण्याची शक्यता आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो आशिया कप-2022 चा भागही होऊ शकला नव्हता. बुमराहने या वर्षी 14 जुलै रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळे त्याचे या सामन्यात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
'या' खेळाडूला मिळणार संधी
दुखापतीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (harshal patel) गेल्या सामन्यात चांगलाच महागात पडला होता. त्यांच्या जागी दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते. दीपकही दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्द दुसऱ्या टी20 सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलिया 0-1 आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना 'करा किंवा मरो'चा असणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विजय मिळवते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल/दीपक चहर, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.