Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 2nd Test Day) यांच्यात सुरु असलेल्या दिल्ली कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस असून ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशी 263 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित (Rohit Sharma) 13 आणि उपकर्णधार केएल राहुल चार धावा करून खेळत आहेत. दरम्यान, या सामन्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. एका धडाकेबाज खेळाडूला गंभीर दुखापत झाल्यामुळे हा खेळाडू या सामन्यातून बाहेर पडू शकतो.
दरम्यान नागपूरमधील पहिली कसोटी पहिला दिवस ऑस्ट्रेलिया सर्वबाद 177 तर दिल्लीतील दुसरी कसोटी पहिला दिवस ऑस्ट्रेलिया सर्वबाद 263 झाले. आजपासून सुरू झालेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चुका टाळत बऱ्यापैकी प्रतिकार केला. त्यामुळे नागपूर कसोटीपेक्षा 86 धावा अधिक करता आल्या. दिवसअखेर भारताने बिनबाद 21 धावा करून ऑस्ट्रेलियाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा लाभ मिळू दिला नाही. नागपूर आणि दिल्लीतील खेळपट्टींमध्ये फरक आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघादरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा एक चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या कोपरावर लागला. डेव्हिड वॉर्नरच्या दुखापतीमुळे फिजिओला मैदानावर बोलावावे लागले. डेव्हिड वॉर्नरची ही दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
वाचा: 'Mirzapur' फेम अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
या खेळीदरम्यान मोहम्मद सिराजचा एक चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या हेल्मेटलाही लागला. या घातक गोलंदाजीसमोर वॉर्नरला एक धाव काढण्यासाठी झगडावे लागत आहे. नंतरच्या दिवसात, तो भारतीय फलंदाजी दरम्यान क्षेत्ररक्षण देखील केला नाही. अशा परिस्थितीत, त्याच्या दुखापतीबद्दल मोठे अपडेट देत, उस्मान ख्वाजाने पुष्टी केली की वॉर्नर 100% नाही आणि कार्डमध्ये बदल होऊ शकतो.
पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नरवर उस्मान ख्वाजा म्हणाला, 'वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उद्याचे आकलन करावे लागेल, सध्या तो थोडा थकला आहे. त्याच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली. येथून काय होते ते वैद्यकीय कर्मचारी पाहतील.' फॉक्स स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, जर वॉर्नर सामन्यातून बाहेर पडला तर मॅट रेनशॉ फलंदाजीला सुरुवात करेल. रेनशॉने नागपुरात पहिली कसोटी खेळली, ज्यात त्याने पहिल्या डावात 2 धावा आणि दुसऱ्या डावात 0 धावा केल्या.