मुंबई : सध्याच्या ऑस्ट्रेलियन टूरवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने केवळ आपल्या संघाचे मनोबल वाढवले नाही, तर त्याने प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात त्याने घर केलं आहे.
ब्रिस्बेन कसोटीच्या दुसर्या डावात मोहम्मद सिराजने स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनसह 5 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना माघारी पाठवलं. या सामन्यात त्याने एकूण 6 विकेट घेतले आहेत.
मोहम्मद सिराजने जोश हेझलवूडची विकेट घेताच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपुष्टात आला. टीम इंडियाचा उर्वरित संघ ड्रेसिंग रूममधून बाहेर आला आणि मैदानाजवळ या वेगवान गोलंदाजाची प्रशंसा करू लागला.
मोहम्मद सिराज ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना जसप्रीत बुमराहने त्याला बोलावून 'और मियां' म्हटले आणि बुमराहने सिराजला मिठी मारली व त्यांचे अभिनंदन केले तेव्हा भावनिक क्षण सगळ्यांनीच अनुभवला.
A standing ovation as Mohammed Siraj picks up his maiden 5-wicket haul.#AUSvIND #TeamIndia pic.twitter.com/e0IaVJ3uA8
— BCCI (@BCCI) January 18, 2021
भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ब्रिस्बेन कसोटीत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत, सिराजने बुमराहची भूमिका चांगली निभावली. या युवा गोलंदाजावर जी जबाबदारी सोपविली, त्याने ती पार पाडली याबद्दल बुमराहला नक्कीच आनंद झाला असेल.