अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी इंग्लंड संघाच्या दांड्या गुल केल्या. 112 धावांवर संघातील सर्व खेळाडू तंबूत पाठवण्यात भारतीय संघाला मोठं यश मिळालं. कर्णधार जो रुट यांच्या नेतृत्वामध्ये सर्वात कमी स्कोअरवर ऑलआऊट होण्याची आतापर्यंतची चौथी वेळ असल्याचं सांगितलं जात आहे.
इंग्लंडच्या संघातील एका क्रिकेटपटूकडून मोठी चूक मैदानात झाली आहे. याच चुकीसाठी आता त्याला ताकीद देण्यात आली असून इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा ऑलराउंडर बेन स्टोक्सकडून तिसऱ्या डे-नाईट सामन्यातील पहिल्याच डावात मोठी चूक झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ICCने मागच्या जून महिन्यात काही कडक निर्बंध घातले होते. बॉल चमकवण्यासाठी त्यावर थुंकी लावण्याची बंदी घालण्यात आली आहे. तर बेन स्टोक्स नेमकं पहिल्याच दिवशी बॉलवर थुंकी लावून बॉलला घासताना दिसला. त्याच्या या चुकीसाठी त्याला अंपायरकडून ताकीद देण्यात आली आहे. त्याच्या या कृतीनंतर बॉलला सॅनिटाइझ करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा सामना सुरू करण्यात आला.
भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पहिल्याच दिवशी अक्षर पटेलनं सर्वांची मन जिंकली आहे. सर्वाधिक इंग्लंडच्या सर्वात जास्त खेळाडूंना त्यानं बाद करण्याचा विक्रम केला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला 200 टप्पाही गाठू दिला नाही.