Ind vs Eng: भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजपूर्वी 2 क्रिकेटपटूंनी घातला घोळ

टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी इंग्लंडमध्ये नेमका काय घोळ घातला वाचा सविस्तर

Updated: Jul 25, 2021, 04:42 PM IST
Ind vs Eng: भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजपूर्वी 2 क्रिकेटपटूंनी घातला घोळ

मुंबई: टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत. 4 ऑगस्टपासून कसोटी सीरिज इंग्लंड विरुद्ध सुरू होणार आहे. या सीरिजआधी इंग्लंड दौऱ्यावर असताना 2 खेळाडूंनी घोळ घातला आणि आपलंच हसं करून घेतलं आहे. यासंदर्भातील एक ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

इशांत शर्मा शर्मा आणि हनुमान विहारी यांनी प्रिया मलिक हिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकल्याबद्दल अभिनंदन देणारं ट्वीट केलं आहे. मात्र आपली चूक झाली हे कळताच या दोघांनीही ट्वीट डिलीट केलं. प्रिया मलिकने हंगेरी इथे आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकवलं. बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 ने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं. 

टीम इंडियातील या दोन खेळाडूंनी केलेलं चुकीचं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. सध्या इशांत शर्मा आणि हनुमान विहारी इंग्लंड सीरिजची तयारी करत आहेत. टीम इंडियाच्या तीन खेळाडू जवळपास सीरिजमधून बाहेर झाले आहेत. आवेश खान, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना गंभीर दुखापत झाल्याने टेस्ट सीरिज खेळू शकणार नाहीत. 

दुसरीकडे इंग्लंड दौऱ्यावर पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर नुकताच ऋषभ पंतचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानं तो पुन्हा एकदा संघात सरावासाठी सामील झाला आहे. दुसरीकडे विराट कोहली आणि अजिंक्य राहाणे या दोघांची प्रकृती ठीक नसल्याने सराव सामने खेळू शकत नाहीत. 

टीम इंडिया इंग्लंडमध्ये चॅम्पियनशिप पराभूत झाल्यानंतर आता इंग्लंड सीरिजकडे सर्वांचं लक्ष आहे. 5 सामन्यांची कसोटी सीरिज जिंकणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे.